उपक्रम
षडाक्षरी
विषय -- भक्तीत रंगलो
भोळा भक्ती भाव
मनात दाटला
नामाचा गोडवा
आवडू लागला 1
घेता तव नाम
दुःख निवारण
होते पहा सदा
आनंदी जीवन 2
उठता बसता
स्मरते तुजला
ध्यास तो नामाचा
लागला मजला 3
वाटे सदा ध्यावे
रमावे भक्तीत
जगण्या आगळ्या
अशा त्या स्फूर्तीत 4
लागली जिवाला
भक्तीचीच आस
भक्ती भजनाचा
लागलासी ध्यास 5
तुला विध्नेश्वरा
आले मी शरण
स्विकारा नमन
दाखवा चरण 6
करा कृपा आता
आम्हासी रक्षावे
सकळ जगाचे
दुःख हे हरावे 7
वैशाली वर्तक
अहमदाबाद
गुजरात
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा