शुक्रवार, १४ जानेवारी, २०२२

शृंगार मनाचा


मन असते निर्वीकार.
घडवावे ,सजवावे शृंगारावे
तयास तसे ..
ते सजतसे
अन्,  शृंगारता भुषणांनी तनाला
  दिसते ते बाह्य सौंदर्य  
पण , मनाला शृंगारता 
वाढे आंतरिक सौंदर्य .

सात्त्विक विचार ,सुविचार 
प्रेमळता, माया , दया  , क्षमाशीलता
आभुषणे असती मनाची
 या भुषणांचे शृंगारण , नटवणे होते
मायबापांकडून बालपणात.
पुढे  मानव भुषवतो तयां 
जसा वाढतो,
मोठा होतो जीवनात. 
तेच असती  मनाचे शृंगार 
षडरिपू पासून दूर रहाता
मोह ,माया ,मद, मत्सर,  काम, क्रोध
मनाच्या कुपीतून काढून टाकता
मन शृंगारिक होते अन्,
 सत्व गुणांनी रुप उजळते
साधे सोपे  श्लोक  दासांचे  
तेच येती कामास
मनाच्या शृंगारास
दावा माणुसकी
तोची माना धर्म 
त्यातच दडले 
जीवनाचे मर्म 
याच मनाच्या गुणाने 
वाढे मनाचे रुप खरोखर 
होतेची मन शृंगारिक
सुंदर अन  मनोहर
 हाची असे मनाचा शृंगार 
ज्याने तनाचा पण  वाढे शृंगार


वैशाली वर्तक 


















आपण करतो नेहमीच
 शृंगार तनाचा
वाढविण्या बाह्य सौंदर्य 
पण, खरे सौंदर्य तर हवे
 आंतरिक मनाचे

मनाच्या शृंगारा साठी
षडरिपू असती कारण
मनी नको अहंकार 
दूर सारा मी पण



याच मनाच्या गुणाने 
वाढे मनाचे रुप खरोखर 
होतेची मन शृंगारिक
सुंदर अन  मनोहर  




शृंगार मनाचे

आपण करतो नेहमीच
 शृंगार तनाचा
वाढविण्या बाह्य सौंदर्य 
पण, खरे सौंदर्य तर हवे
 आंतरिक मनाचे

मनाच्या शृंगारा साठी
षडरिपू असती कारण
मनी नको अहंकार 
दूर सारा मी पण

यासाठी वाचा
साधे सोपे  श्लोक  दासांचे  
तेच येती कामास
मनाच्या शृंगारास

दावा माणुसकी
तोची माना धर्म 
त्यातच दडले 
जीवनाचे मर्म 

याच मनाच्या गुणाने 
वाढे मनाचे रुप खरोखर 
होतेची मन शृंगारिक
सुंदर अन  मनोहर












कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...