अक्षरमंच
राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा क्रमांक 20
अष्टपैलू संस्कृती कला अकादमी काव्यलेखन
स्पर्धा क्र २०
विषय - संगत
बालपणी मायबाप
देती सुंदर संस्कार
मिळवण्या जीवनात
सर्वोत्तम पुरस्कार
संस्कारात महत्त्वाचे
असे साथ संगतीचे
जेणे कारणे भविष्य
होते सदा प्रगतीचे
सदा धरावी *संगत*
चांगल्याच माणसांची
मिळे छान शिकवण
जोड मिळे सत्कर्माची
फुला संगती मातीही
होत असते गंधित
तशी उत्तम संगत
करी आयु प्रभावित
पुष्प संगती धरूनी
देवागळा मिळे मान
धागा शोभे देवापाशी
होई त्याचाही सन्मान
धरा संगत चांगली
साधा जीवनी उत्कर्ष
ऐका संतवाणी सांगे
जीवनात मिळे हर्ष
वैशाली वर्तक
अहमदाबाद.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा