शल्य मनीचे उभी हंसापाशी नारी भव्य दिव्य महालात सुखे घेतसी लोळण परि शल्यची मनात सांगु शके ना कुणाला गुज माझिया मनीचे कसा साहु विरह हा भाव मम अंतरीचे
सहावेना एकटीला कैसे कंठु दिन एक जरी आहे राजसुख दिन उदास प्रत्येक
आहे मी राज मंदिरी सर्व सुखेची अपार तमातल्या ज्योती सम सख्याविना दुःख फार
हंसा तुची साथी माझा भाव कथिले तुजला सख्याविना कैसे कंठु तूची सांग ना मजला
..... वैशाली वर्तक अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा