सप्तरंग कला , क्रीडा,विज्ञान, साहित्य व संगीत अकादमी
आयोजित
राज्य स्तरीय चित्र काव्य स्पर्धा २०२१
होते खात मजेत चविष्ट भेळ
गेले लक्ष पेपरातील चित्राकडे
काय योगायोग आला जुळूनी
चित्रातील मुले पाहती भेळेकडे.
लहान पोरे, करीती याचना
जणू चवदार भेळेकडे पाहूनी
दीनवाण्या मुलांचे चित्र पाहता क्षणी
घास भेळेचा माझा राहिला , अडूनी.
होती ती चमचमीत चविष्ट भेळ
पण चित्राने मन माझे गहिवरले
भेळ तशीच पेपरात ठेवूनी
मन विचारात गुरफटले
लहान मुले गोजीरवाणी
हट्ट करिती भुकेने भेळेसाठी
अन्,.. मी मात्र , आस्वाद घेते
भरल्यापोटी स्वानंदासाठी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा