मंगळवार, १८ मे, २०२१

नशा तुझ्या प्रेमाची

यारिया साहित्य  कला समूह
विषय - नशा तुझ्या  प्रेमाची

नशा तुझ्या  प्रेमाची
*निसर्गा*  वसे मनात
होताची सकाळ मी
येते तुझ्या  सानिध्यात

किती आनंद मिळतो
नभी पाहूनी आदित्य
आनंदाने पुलकित
होते माझे मन नित्य

हळुवार पसरे पसारा
रवी सोनसळी किरणांचा
होई लाजत  प्रभात
क्षण प्रफुल्लित होण्याचा

नशा सृष्टीच्या प्रेमाची
चढे वसंत ऋतु येता
पहा कशी धरा सजली
नशा चढते  प्रेमाची आता

हरएक ऋतु  असे 
आगळाची अवर्णनीय
किती करावे गुणगान
नशा तव प्रेमाची रमणीय

वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गीत...... माझ्या भारत देशाचा.

देशभक्ती गीत  माझ्या भारत देशाचा, मला  सदा अभिमान प्राणाहून असे  प्रिय, तयाच्या  गौरवात शान भाव वसे समतेचा ,धर्म नांदती अनेक नसे भेद- भाव जन...