सुचत नाही वाटले तरी
हवा तो विचार सुचण्यास
येते आठवण चहाची
जमता ढग आकाशी
चहा आल्याचा आठवे
वाटे मिळावा चुटकी सरशी
हाती असता चहा
गप्पा येतात रंगात
आठवणीं येतात जुळून
जुन्या काळच्या मनात
रस्त्याच्या चहाच्या टपरीवर
चहाची मजा येते खरी
फक्कड चहाचा घोट
जोडीला देतो अनेक खबरी
उगाच नाही म्हणत
चहास पृथ्वीवरील अमृत
येता जाता प्यावा चहा
प्राशन करावे जठरामृत
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा