*एक कविता एक चारोळी काव्य लेखन स्पर्धा*
विषय - *शब्दशिल्पकार*
काव्य प्रकार -- अष्टाक्षरी
*साहित्यिक*
जसा घडवितो मूर्ती
शिल्पकार मनोहर
भाव दावी शिल्पकृती
जणू भासे खरोखर
जुळवूनी शब्द शब्द
होते तयार लिखाण
असो मग गद्य पद्य
शब्दांचीच असे खाण
मुल्य सर्वदा शब्दांचे
जाणे *शब्द शिल्पकार*
शब्द ओवितो उचित
करी तो शब्दाविष्कार
शब्द शिल्पकार सदा
देतो मनास उभारी
जपणूक संस्कृतीची
काम त्याचे सदा भारी
शब्द शिल्पकारांपैकी
वाल्मिकींचे रामायण
जन ज्याचे करितात
सदासाठी पारायण
मला जडलाची छंद
शब्द गुंफण्याचा मनी
मिळे स्फूती मम मना
होते काव्य त्याच क्षणी
वैशाली वर्तक.
अहमदाबाद
चारोळी
शब्दशिल्पकार
नीट नेटक्या शब्दांची
पहा सुरेख बांधणी
शब्दशिल्पकारे केली
चार ओळींची मांडणी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
शब्द करतात जादू दावी तयांची कमाल
शब्द गुंफता तयार
पहा सुंदरशी माळ
मनातील भाव झरे
उतरती साहित्यात
शोभे गद्य पद्य रुपे
शब्द येती संवादात
करा मोजून मापून
शब्द सदैव वापर
नको फापट पसारा
उगा नकोच खापर
शब्द करीतात जादु
असे विचार सोबत
पहा होतेची तयार
छान असे मनोगत
जशा कल्पना सुचता
मनी शब्द उमलता
शब्द फुले पहा फुले
दिसे कशी बहरता
शब्द करुनीया जादु
हास्य करुण भावना
भाव अद्भुत दाखवी
पूर्ण होती मनो मना
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा