मंगळवार, १८ मे, २०२१

तुज विना कसे जगु. /तुझ्या विना .... तू तेथे मी

नाम तुझे सदा ओठी
तव स्वप्नात जगते
तुजविना जगणे हे
मज निरस भासते


गंध तुझ्या  प्रीतीचा
दरवळे अंतरात
रोज वसंत फुलता
अनुराग   हृदयात

कशी साहु मी विरह
कैसे कंठु दिन एक
जगु कशी तुझ्या  विना
दिन उदास प्रत्येक 

दिसे तव मूर्ती  सदा
तर कळे हा अभास
वाटे तू आहे समीप
ध्यानी मनी तुझा ध्यास

भासे वैरीण ही रात
जग निद्रेच्या कवेत
राहे मी तळमळत
आठवांच्या  समवेत

जगु कशी तुझ्या विना
कसा करू   मी निग्रह 
 सांग सखया मजला
कसा साहू मी विरह

वैशाली वर्तक


अभामपसा कोप्र समूह 
आयोजित 
उपक्रम 
विषय - तुझ्या  विना

 देवा तुची कर्ता, तूची करविता
तुझ्या  विना नसे,  आम्हाला आधार
सारी सृष्टी  विसंबित तुजवरी
तूची संभाळीतो जगताचा भार         १

तूची दिधलेस सुंदर  आकाश
तयात निर्मीले सूर्य चंद्र तारे
तव कृपा प्रसादे घडती ऋतु
तुझ्या  विना कुठले आनंद वारे           २


 जल असे जीवन जलचरास
 नदी जलाशय सुंदर  विश्वात
तुझ्या  विना कशी बहरेल सृष्टी 
कशी डौलतील पिके शिवारात           ३

आहे तुझी कृपा दृष्टी जगावरी
 होते सारेची नित्य जीवन शक्य
 आम्ही बालके तुझीच लेकरे
तुझ्या  विना हा विचारचीअशक्य

वैशाली वर्तक 
अहमदाबाद



विषय - तू तिथे मी   २८/१/२२
    *आस मनीची*

सुमनांचा गंध कधीच
 दूर, न होई खचित
तैसे *तू तिथे मी*
रहाणार सदोदित

आहे तसेच आपले 
दोन तने एक मन
विसर  पडे  ,  न कदा
 जीवा एकही क्षण

रहावे तू मम संगती
असेच वाटते मनात
साथ हवी  निरंतर
 हीच आस अंतरात     3

येते नभी चांदणी
वाट पहाते चंद्राची
तैसे *तू तिथे मी*
असणार सदाची   4

  कशी जगेल मासोळी
  जला विना पळभर
 तुझ्या अस्तित्वाने
   दिसे  दिशा खरोखर   5

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...