उपक्रम
षडाक्षरी काव्यविषय- पहिली नजर
शिर्षक- तुला पाहताच
दृष्टीस पडली
मनात भरली
माझी तू व्हावी
आसच धरली
पहीली नजर
काय जादुभरी
काही समजेना
मला क्षणभरी
लागले जीवास
वेडच मजला
शोधणे बहाणा
भेटण्या तुजला
योगायोग झाली
भेट अवचित
उमजेना शब्द
मला कदाचित
साधिला संवाद
कटाक्षे क्षणिक
नकळत मीही
झालो भावनिक
अजुन स्मरतो
पहिला तो स्पर्श
झालेलो बेधुंद
मनातला हर्ष
पहिलीच भेट
स्मरते मनात
तुझ्यात गुंतलो
कळले क्षणात
वैशाली वर्तक
20/4/2020
विषय --- दोन घडीचा डाव
जन्म आणि मृत्यू
यांना जोडण्याचा
दोनच घडीचा
डाव जीवनाचा 1
बालपण काळ
सदा रम्य असे
कसलीही चिंता
त्याकाळात नसे 2
मायबाप हेच
देती सदा सुख
सोसुनिया कष्ट
दूर करी दुःख 3
येतो काळ पुढे
मग प्रौढत्वाचा
ऊन सावलीचा
दावी कर्तृत्वाचा 4
सत्कर्मा करिता
वसे खरा देव
आयुष्यात मोठी
असे तीच ठेव 5
करा तडजोड
संसारात थोडी
वाढवी जीवनी
सदासाठी गोडी 6
जीवनाचे हेची
ध्यानी ठेवा सार
जगण्या आनंदी
करावा विचार 7
.....वैशाली वर्तक
कल्पतरू जागतिक साहित्य मंच
आयोजित उपक्रम
२९\७\२३
विषय प्रीत मैत्रीतली
प्रीत मैत्रीतली
दोनही जीवात
वाहे प्रेम झरा
सदैव मनात
नसे दुजाभाव
मदतीस साथ
प्रेमळची भावे
घेत हाती हात
प्रीत मैत्रीतली
दावीती महती
कृष्ण सुदाम्याची
सारेची जाणती
नातेच मैत्रीचे
असतेच गोड
कदा दोन मनी
दिसेनाची खोड
सर्वां मिळो सखा
द्रौपदीचा हरी
प्रीत मैत्रीतली
मोद जग भरी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा