रविवार, २५ एप्रिल, २०२१

अष्टाक्षरी. आठवून तरी बघ

काव्य स्पंदन राज्य स्तरीय  समूह 02
दैनंदिन उपक्रम 
अष्टाक्षरी














विषय -- आठवून तरी बघ

अशी ग तू कशी सखी
 कसे नाही तुझ्या ध्यानी
आठवून तरी बघ
 खचितच   आण मनी

  
स्मरे मजला अजून
उरी जपलेला प्रीतीचा
गंध सांगेल तुजला
आपुल्या  प्रथम भेटीचा

  भेट आपली पहिली
  चंद्र  साक्षीत घडली
   तूज मज पहातोय
  बघ  तयाही स्मरली


येते का सय फुलांची
 फुले होती फुललेली
आठवून तरी बघ
उमजून हसलेली 

किती गोड आठवणी
जपलेल्या मनातूनी
 कशी खंत नाही जरा
आठवेल क्षणातूनी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

















येते का सय फुलांची
 फुले होती फुललेली
आठवून तरी बघ
उमजून हसलेली 

किती गोड आठवणी
जपलेल्या मनातूनी
 कशी खंत नाही जरा
आठवेल क्षणातूनी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह  उपक्रम 1391 दि 3/2/26 विषय. वही आनंदिले मनोमनी वही पाहून  सुंदर  गुज मनीचे सांगण्या  मन धावे क्षणभर  किती सुबक बा...