शुक्रवार, २३ एप्रिल, २०२१

पुस्तक विषयक अष्टाक्षरी... १पुस्तकमाझासखा||२वाचाल तर वाचाल|३|मैत्री करु पूस्तकांशी|४अभंग|पुस्तक / पुस्तक संगतीत

पण

 माझी  लेखणी 

आजचा उपक्रम 23/4/21

विषय - पुस्तक  माझा सखा


वेळ मजेत जायला

हवा एक सवंगडी

देई मनाला उभारी 

असे जो मन कवडी


पाहताच तया मनी

आनंदाचा पार नसे

खरा जीवलग मित्र 

 याची  ग्वाही देत असे


येता कठीण प्रसंग

 सख्यासम  उभा पाठी

 संयमाचा दावी मार्ग 

 हवा तो आधारासाठी


असा असे एकमेव 

*मित्र  माझा तो पुस्तक* 

भरलेला  जो ज्ञानाने

भेटीसाठी मी उत्सुक 


खरा तो मार्गदर्शक 

पहा ज्ञानाचा सागर

नसे उणीव ज्ञानात

घ्यावी भरुन घागर


वैशाली वर्तक 


अ भा म सा प स्वप्नगंध समूह

उपक्रम 





.                                                 

                                        


विषय - वाचाल तर वाचाल
     शीर्षक  *उचित कथन*
23/4/21
वाचाल तर वाचाल
किती उचित कथन
अन्न  पाणी जगण्यास 
तसे हवे ते वाचन

युग असे विज्ञानाचे 
शोध लागताती नवे
ज्ञान मिळविण्यासाठी
वाचनच सदा हवे

वाचनाची गोडी जया
करी तो नित्य वाचन
होई ज्ञानाने पंडित 
देण्या लोका प्रवचन

खत पाणी वृक्षा जसे
हवे सदा फुलण्यास
वाचनाने भर होई 
यश प्राप्ती करण्यास

जैसे वाढते वाचन
मना देतसे संगत
वाचनाची ही सवय
आणी जीवनी रंगत

किती वाचाल तेवढे 
कमी वाटते जीवनी
वेड लावीते जिवाला
मिळे हर्ष सदा  मनी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद






सिध्द  साहित्यिकका समूह
जागतिक पुस्तक दिनानिमित्त
ओळ काव्य लेखन
ओळ -- मैत्री  करु पुस्तकांशी

जीवलग असती मित्र 
येती वेळोवेळी कामास 
तैसे पुस्तक  पण असती
धावूनी येती कठीण प्रसंगास


जरा वाटले एकटेपण
जाते लक्ष पुस्तकाकडे
हळुवारा पाने उलगडता
लक्ष वेधते स्वतःकडे

न रागावता बोलता
देई ज्ञान देई संगत
*मैत्री करु पुस्तकाशी*
जीवनात येते रंगत

अंतरात ज्ञानाची साठवण
देई विविध विषयांचे ज्ञान
मैत्री  करु पुस्तकांशी
मनी ठेवू ज्ञानाची जाण

पुस्तके असती मार्गदर्शक 
दावीती अचूक  वाट जीवनी
कधी काळी संभ्रमात पडता 
मित्रासम देती संजीवनी

करा मैत्री पुस्तकांशी
तेची असती आधारा विश्वाचे
वृध्दी करिती ज्ञानात
जीवन घडविण्या यशाचे

वैशाली वर्तक 
अहमदाबाद





विषय - पुस्तक

करा वाचन
सदा पठण
ते अज्ञानाचे
करे हरण          1


ज्ञानाची खाण
अगाध छान
पुस्तकातील 
घ्यावे हो ज्ञान       2

वाचावे ग्रंथ
सांगती संत
मिळवा ज्ञान
मिळे सुपंथ         3

मनीची आस
हवा हो ध्यास
वाचनालय
त्यासाठी खास      4

नसे लहान
असे महान
पुस्तकं देते
जगी सन्मान      5

असे सोबती
करी गंमती
वाचनासाठी
नको संमती        6

मनोरंजन
बुध्दी व्यंजन
ज्ञान वर्धन
मानती जन           7

येताची घरी
पुस्तक  करी
आनंद वाटे
तो क्षणभरी    8

वैशाली वर्तक


काव्यस्पंदन राज्य स्तरिय 02

दैनंदिन उपक्रम 

विषय -- *पुस्तकांच्या संगतीत**

अष्टाक्षरी

पुस्तकाच्या संगतीत

    *जीवनाची रंगत*


पुस्तकाच्या  संगतीत

भान नुरते वेळेचे

कधी न उमजे मना

गुंग होणे नेहमीचे.


जरा नजरेस येता

घेतो सहज  हातात

थोsडे पाहू येते मनी

मन रमते क्षणात


पुस्तकाच्या संगतीत

होई रंजन मनाचे

गुरु समान पुस्तक 

खुले द्वार ते ज्ञानाचे


भासे पुस्तक  अखंड 

ज्ञाने वहाणारा झरा

किती भरल्या घागरी

अखंडित वाहे खरा


किती प्रकारचे ज्ञान

जणु ज्ञानाची खाण

सदा पानापानातून

मिळे ज्ञान, ठेवा जाण



पुस्तकाच्या संगतीत

दिनरात्र होते एक

घेता तया हाती वाटे

काढू वाचूनी अनेक.


 नाते  असे पुस्तकाचे

 वाटे हवीच संगत

विना पुस्तक म्हणजे

नसे जीवनी रंगत


वैशाली वर्तक 

अहमदाबाद


अभंग



भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच सातारा

आयोजित उपक्रम

विषय .. पुस्तकाचे पान


जपावे पानांना  | नुसते न पान |

परिपूर्ण ज्ञान.   | भरलेले ||.        १


शब्द शब्द असे  |ज्ञानाचे ते कण |

उजळे जीवन.   | आपणांचे ||.     २


पाकळी फुलांची | पसरले गंध|

पान लावी छंद | वाचनाचा ||.        ३


 लावे जिवा वेड |एक एक पान |

 हरवते भान.   | वाचकांचे.     ||.     ४


पानोपानी पहा | ज्ञानाच्या घागरी|

पुस्तक सागरी. | भरलेल्या||.           ५


पुस्तकाचे पान  | देई जगी मान |

असे ज्ञान खाण | सर्वजना ||.         ६


पुस्तक पानांची  | आहेच महती |

 सर्वच जाणती   |     सांगे वैशू  ||. ७


वैशाली वर्तक

अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...