प्रेमाची अक्षरे स्पर्धेसाठी
अष्टाक्षरी रचना
लागे चाहुल थंडीची
------------------------
लागे चाहूल थंडीची
अंगी भरे हुरहुडी
शोधा गरम कपडे
ठेवा उबदार कुडी
थंड वारा झोंबे अंगा
दूर सारण्या गारवा
थंडी वाढताच वाटे
चहा हा सदाची हवा
जादु असे ह्या थंडीत
झोंबे गार गार वारा
थंडावली सारी सृष्टी
अंगी उठे तो शहारा
शहारती तृणपाती
दव थेंब चमकती
भासे मोतियांच्या माळा
पुष्प लता बहरती
शरदाच्या चांदण्यात
वेध गुलाबी थंडीचे
थंड गारवा तो सांगे
दिन आले शेकोटीचे
ऋतू प्रीतीचा लोभस
निसर्गाची ती करणी
दिसतील धनधान्ये
केल्या कष्टाची भरणी
वैशाली वर्तक 16/12/2019
: वर्ल्ड व्हिजन टाईम्स
अष्टाक्षरी रचना
लागे चाहुल थंडीची
------------------------
लागे चाहूल थंडीची
अंगी भरे हुरहुडी
शोधा गरम कपडे
ठेवा उबदार कुडी
थंड वारा झोंबे अंगा
दूर सारण्या गारवा
थंडी वाढताच वाटे
चहा हा सदाची हवा
जादु असे ह्या थंडीत
झोंबे गार गार वारा
थंडावली सारी सृष्टी
अंगी उठे तो शहारा
शहारती तृणपाती
दव थेंब चमकती
भासे मोतियांच्या माळा
पुष्प लता बहरती
शरदाच्या चांदण्यात
वेध गुलाबी थंडीचे
थंड गारवा तो सांगे
दिन आले शेकोटीचे
ऋतू प्रीतीचा लोभस
निसर्गाची ती करणी
दिसतील धनधान्ये
केल्या कष्टाची भरणी
वैशाली वर्तक 16/12/2019
: वर्ल्ड व्हिजन टाईम्स

शब्दांकूर साहित्य समुह
आयोजित
उपक्रमासाठी
विषय - सूर्य चोरला कोणी
अष्टाक्षरी
दिन आलेत थंडीचे
दाट धुके दाटलेले
आदित्याचा नाही पत्ता
नभ मेघांनी झाकोळले 1
रवी मेघात दडला
शलाका काढती वाट
सूर्य चोरीला कोणी
जरी सरली पहाट 2
धुक्याची शाल तलम
धरेने पांघरली लाजत
रवी दूर करी किरणांनी
आली सकाळ हासत 3
दवात न्हाली सकाळ
थंड गार वाहे वारा
जाणवे गुलाबी थंडी
अंगी उठतो शहारा 4
ऋतु थंडीचा लोभस
फुले फुलली रंगीत
तृणपाती वर दवबिंदु
ऐका पक्षांचे संगीत 5
दिन थंडीचे येताची
दूर करण्यास थंडी
लावा अंगणी शेकोटी
घालूया गरम बंडी 6
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कल्याण डोंबिवली महानगर २
विषय ...डिंक मेथी
हिवाळ्यात हमखास
येता थंडीचे दिवस.
डिंक मेथी आठवते.
अंगी उष्णता वाढण्या
तेची पोषक ठरते.
मेथी जरी कडवट
आरोग्य निरोगी कामी
सांधे दुखी दूर करी
वात हरण्यास नामी
थंडी पासून रक्षण्या
डिंक हवा हमखास
डिंक मेथीचे लाडूच
देती गर्मी शरीरास
येता ऋतू तो हिवाळा
सुका मेव्याचे सेवन
आरोग्यास लाभदायी
ताज्या भाजांचे जेवण
असे असते सात्विक
डिंक मेथी आहारात
पहा कसे संवर्धन
राखण्यास हिवाळ्यात
वैशाली वर्तक
अहमदाबाद
सर्व धर्म समभाव लोकशाही साहित्य मंच आयोजित उपक्रम
विषय. दाटले धुके आसमंती
दिन आलेत थंडीचे
दिसेनात रविराज
झाकोळले नभ सारे
वेगळाच आज साज
पांढरट धुसर शाल
अवनीने पांघरली
मधेच घडे दर्शन रवीचे
धुक्यात वाट हरवली
दव बिंदू पानावर
भासे जणु मोती माळ
थंड झुळुक वा-याची
शहारली सकाळ
चाले सुंदर खेळ रवीचा
पहा निसर्गाची महती
अलवार उमलती कळ्या
गंध दरवळे आसमंती
वैशाली वर्तक
अहमदाबाद
सिद्ध साहित्यिक समूह आयोजित
उपक्रम अष्टाक्षरी काव्य लेखन
विषय ... ऋतू गुलाबी प्रेमाचा
शीर्षक ..
दिन आलेत थंडीचे
दिसेनात रविराज
झाकोळले नभ सारे
वेगळाच आज साज
शाल धुसर पांढरी
अवनीने पांघरली
न घडे दर्शन रवीचे
वाट पण हरवली
वाटे सदाची पडून
बिलगून ते रहावे
उब प्रेमाची सखया
देत नित्यची बसावे
पहा कशी बहरली
धुंद गंध रातराणी
घेत हात हाती तुझा
गाऊ प्रेमाची गाणी
दव बिंदू पानावर
भासे जणु मोती माळ
थंड झुळुक वा-याची
शहारली ती सकाळ
खेळ सुंदर रवीचा
जाणा निसर्ग महती
कळ्या हळु उमलती
दरवळ आसमंती
वैशाली वर्तक
अहमदाबाद
मोरणा कवी कट्टा समूह सांगली पश्चिम महाराष्ट्र
उपक्रम क्रमांक ६८
दि २३\१२\२५
विषय ... शेकोटी थंडी
आली लहर थंडीची
वाहे थंड बोचरा वारा
वस्त्रे गरम हवीतच
अंगी उठता शहारा
शोधा गरम कपडे
छान छान ऊबदार
बनवा फक्कड मजेचा
चहाआल्याचा ,लज्जतदार
ढलप्या घेता लाकडाच्या
करा पाला पोचोळा गोळा
जमूनी पेटवूया शेकोटीला
करा मस्त गप्पांचा सोहळा
जुन्या आठवणीं त्या गोड
रंगात येती हास्य विनोद
विसरून राग लोभ तंटा
बसल्या जागी मिळे मोद.
मिळता उर्जा शेकोटीने
रोजच होती भेटी-गाठी
मैत्र वाढेल आपापसात
अजून काय हवे सुखासाठी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
21/12/2021, 12:32 pm] Vaishali Vartak: अ भा म ठाणे जिल्ला समूह 1
उपक्रमासाठी
दि 20/12/21
चित्र काव्य
शेकोटी सोहळा
आला आला ऋतु हिवाळा
रात्री पडे थंडी कडाक्याची
मुलांनी गावात एकत्र होऊनी
सोय केली थंडी दूर करण्याची
घेऊनी कचरा पाचोळा
सहजतेने केला गोळा
पेटवून केली शेकोटी छान
आनंदाने जणू करती सोहळा
धग मिळते शरीरास
थंडी पासून थोडे रक्षण
शहरी लोका सम तयांनी
केले तयांचे थंडी पासून संरक्षण
बालपणाची असते गंमत
सर्व गोष्टीत करणे मौज
हेच तर असते बालपण
त्या त्या वयात पुरवावी हौस
वैशाली वर्तक
अहमदाबाद
[11/1/2022, 11:27 am] Vaishali Vartak: आला आला ऋतू थंडीचा
मन पहा झाले उल्हासित
किती बहरली फुले सभोती
मिळे स्फूर्ती कामास सदोदित
मस्त हिरव्या ताज्या भाज्या
नजरेस दिसे सर्वत्र हिरवळ
उबदार कपडे शोभतीअंगभर
निरुत्साही मन विसरे मरगळ
रात्री पेटवूनिया शेकोटी
घेउनिया काफी कप संगती
साज चढे गाणी गप्पा गोष्टींना
जमती हुर्डा पार्टीला सोबती.
धुक्याची पांढरी शाल तलम
धरेने पांधरली पहा लाजत
दूर सारिता किरणांनी रवीराज
होते प्रसन्न सकाळ हासत
असा गुलाबी थंडीची ऋतू
असे सर्वांना आवडी चा
दिवस लहान रात्र मोठी
थंडी थंडी करित झोपण्याचा
वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा