रविवार, २२ डिसेंबर, २०१९

स्पर्धेसाठी कविता

        विषय --चाहुल मृत्यू ची

मृत्यू  शब्दच उच्चारता
जीवाला लागते हुरहुर
माहीत असूनी नक्कीच
विचारांचे दाटे काहूर

जाणार त्याच मार्गावर
जरी जाणतो आपण
दुस-याच्या मृत्यू वर
करीती शोक सारे जन


जीवन जगावे आनंदे
आनंदे उचलावे पाऊल
 जन्माला  मरण नक्कीच                
जरी लागता मृत्यू ची चाहुल

निसर्ग  हेची शिकवे
पहा कलिका  उमजणार
न करीता खंत  उद्याची
 जाणून उद्या कोमेजणार

मानव जन्म मिळाला
करुया  सोने सर्वस्वाने
जगुया जीवन  आनंदाने
जाणून उद्याचे  ते "जाणे "

वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...