गुरुवार, १ डिसेंबर, २०२२

अभंग विरक्ती

कल्याण डोंबिवली महानगर 2
आयोजित
उपक्रम
अभंग लेखन
विषय... विरक्ती 

बोलायला सोपे  ! नसावी आसक्ती !
मनाची विरक्ती.  !  अवघड !

जन्मतः गुंतलो !  संसार सुखात !
आसक्ती मनात! सदाकाळ !

 मनी रूजवावी !   आध्यात्मिक गोडी  !  
  वैचारांची जोडी!     जुळतसे !

मनात रुजता  ! अध्यात्म विचार !
सहज साकार ! मनोभाव !

संसारिक  सुख! घरदार पैसा  !
मोह त्याचा ऐसा!   सुटेचिना !

पोरं लेकी बाळी ! पणतुंचे मुख !
पहाण्यात सुख !  मनीअसे.   !

अशी मनावस्था ! असता  अपार !
विरक्ती विचार. ! येई कैसा !

 वैशाली वर्तक
अहमदाबाद

बुधवार, ३० नोव्हेंबर, २०२२

आत्मविश्वास

कमलविश्व राज्यस्तर स्पर्धा साहित्य समूह
आयोजित नोव्हेंबर २०२२
मासिक भव्य राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा
विषय... आत्मविश्वास
शीर्षक.  *यशाची गुरुकिल्ली*


जीवनात महत्वाचा
ठरतो आत्मविश्वास
ज्याच्या बळावर यश
येते पदरी , हेच खास

बालपणी रूजवावा
मनातूनी *आत्मविश्वास* 
देत शिकवण मनाला
धरण्यास यशाचा ध्यास

करिता पराकाष्ठा प्रयत्नांची
आत्मविश्वास  येतोच मनी
 काम पूर्ण करीनच, अन् 
काम फत्ते होते त्याक्षणी.


गाठले एव्हरेस्ट शिखर 
मिळाली यशाला चाहुल
आत्म विश्वासाच्या बळावर
तेनसिंगने उचलले पाऊल.


असता आत्मविश्वास मनी
संचारते हत्तीचे मनात बळ
येवोत कितीही संकटे
मिळते उज्वल यशाचे फळ.

वैशाली वर्तक
अहमदाबाद


वरतीच कविता नाव बदलून


लालित्य नक्षत्र वेल समूह
आयोजित
विशेष उपक्रम 
विषय....निश्चितच
शीर्षक.  *यशाची गुरुकिल्ली*


जीवनात महत्वाचा
ठरतो आत्मविश्वास
ज्याच्या बळावर यश
येते पदरी , हेच खास

  
निश्चितता म्हणजेच
मनातून आत्मविश्वास 
महत्वाचा ठरे जीवनी
धरण्यास यशाचा ध्यास

  देते प्रयत्नांची पराकाष्ठा
आत्मविश्वास  निश्चितता मनी
 काम पूर्ण करीनच, अन् 
काम पण फत्ते होते त्याक्षणी.


गाठले एव्हरेस्ट शिखर 
मिळाली यशाला चाहुल
आत्म विश्वासाच्या बळावर
तेनसिंगने उचलले पाऊल.


असता निश्चितता मनी
संचारते हत्तीचे मनात बळ
येवोत कितीही संकटे
मिळते उज्वल यशाचे फळ.

वैशाली वर्तक
अहमदाबाद

बुधवार, २३ नोव्हेंबर, २०२२

आरोग्यम धनसंपदा

 अ भा म ठाणे जिल्हा  समूह १

उपक्रम -

विषय - आरोग्यम धनसंपदा


       जीवन मंत्र 

खरच असे कथन

आरोग्यम् धन संपदा

हवे निरोगीच  शरीर

न भासे कधी विपदा


देवाने दिधले शरीर

करावे तयाचे जतन 

स्वच्छ आहार  सेवन

 करा   नेमाने योगासन        


निद्रा ,आहार , व्यायाम

ठेवता सदा नियंत्रित 

नियमितता जीवनात 

जगा जीवन आनंदित


चणे आहेत भरपूर

पण दात नाही मुखात

असूनी धनश्री संपदा

 स्थिती होतसे  जीवनात


संतवाणी  सांगती सदा

  रहा मनाने समाधानी

     जीवन होईल वैभवी 

 जगाल सदैव आनंदानी 



वैशाली वर्तक 

अहमदाबाद

मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०२२

लेख एक प्रवास जीवनाकडे.

लालित्य नक्षत्र वेल
आयोजित
उपक्रम
विषय.. एक प्रवास जीवनाकडे


   खरच जीवन हा एक प्रवासच आहे. जन्म ते अंत काळ हा त्यांचा अवधी.. दिधला  जन्म मानवाचा तयात मेंदू बहाल केलाय देवाने ,सारासार विचार करण्यास. दिल्या आयुष्याचे सार्थक करावे.. नाहीतर, जीवन काय पशु प्राणी पण जगतात.
    पण हा जीवन प्रवास सार्थकी करता व आनंदे उपभोगता आला पाहिजे असे विचार
सहजची निवांतात बसली असता मनी आले. व मन  व्यतित जीवन प्रवासाच्या काळात डोकावले.
  खरच एक एक पाने उलगडता कळले प्रत्येक पान  होते सुंदर. विचार करता वाटे किती ते मनोहर.बालपणीची ती निरासगता आठवून मन आनंदित जाहले.नव्हते त्या जीवन प्रवासात हेवेदावे वा नव्हत्या चिंता वा  काळजी कुठल्याही क्षणाला.
    यौवनात आले .होते ते पान तर  गुलाबी तारुण्याचे.किती मोहक मनोहर रोजची नवी स्वप्ने . नवा दिवस ..नवी आशा आकांक्षा ..नव नव्या दिशा ..स्वप्न साकारण्यासाठी अंगी कर्तृत्वाची मनी अपेक्षा. 
  पुढे जीवन प्रवासात लाभलेला जीवन साथी. त्या बरोबर चे स्वप्नात रंगविलेले.....
           स्वप्नात रंगले मी 
           चित्रा त दंगले मी
         सत्यातल्या जगी या
         झोपेत जागले मी

        अशी भावगीतातल्या नायिके समान झालेला माझा जीवन प्रवास नजरेत आला.
कधी बागेत उगाच चाळा हाताला ..गवत खुडत ची ती स़ध्याकाळ  तर कधी समुद्र किनारी  वाळूत गप्पांच्या नादात रंगविलेली गुलाबी सांजवेळचा  आनंददायी
यौवन प्रवास  चलचित्रा प्रमाणे  अनुभवला. 
    मग कर्तृत्वाचे कर्तव्याचे दिन आठवले व मनोमनी हर्षित झाले. जगी कसा मान मिळविला. आई बाबांचे संस्काराचे गाठोडे कसे कामास आले ‌,याची वेळोवेळी जाण झाली .या सा-या प्रवासातील   अनुभवाचे गाठोडे घेत जीवन प्रवास करत होते 
अनुभवाचे गाठोडे पुन्हा त्या चुका न करण्यास उपयोगी ठरलेले प्रवासातील दिवस.
  असा जीवन प्रवास करत असता काय मिळविले तर समाधानी वृती. आता त्याच समाधानाचे जीवन प्रवासाचे पिवळे.. पण आनंद देणारे पान. या पर्यंत जीवन प्रवासात पोहचले. विधात्याने दिधले सारे काही. जीवन प्रवास आनंदी मनाने पार केला.
आणि पहाते तर खरंच सांजवेळ झाली होती. लगबगीने देवघराकडे वळले. 
समईतील ज्योती कडे पहात सुखद जीवन प्रवासासाठी. देवास वंदन केले 

देवास वंदन केले.

बुधवार, १६ नोव्हेंबर, २०२२

विधीलिखीत


विषय - विधिलिखित           13/7/2020


सामान्यतः असे  वदती जन
जे होते ते असते विधी लिखीत
मग कशाला करायचे प्रयत्न 
व्हायचे ते होणार हे...  खचित

कधी कोणास मिळते चिमूटभर 
तर कोणास मिळते ओंजळभर
ते तर असते विधीलिखीत फळ
तयासाठी लागते सत्कर्माचे बळ

म्हणती वृषभ रास असे भाग्यवान
चुकले का तयांना दुःखाचे पहाड
देवत्व पावूनी पण, कृष्ण अन् रामाला
सुटली नाही  दुःखाच्या नशिबाची पाठ

नैसर्गिक  आपत्तीत दगावतात माणसे
देवाच्या कृपेने तरली जाती लहान अर्भके
तिथे म्हणावे खेळ  विधी लिखीताचा
न करिता सायास जीव वाचविण्याचा

घडायचे ते घडणार ते नाही चुकणार
विश्वास हवा बाहुवर नको हस्त रेखांवर
अन् ठेवावी सदा दृढ श्रध्दा देवावर
मग विधी लिखीताची होते कृपा दृष्टी  आपणावर



वैशाली वर्तक
नोंदणी क्रमांक 189
अहमदाबाद 
गुजरात  स्टेट
8141427330

संयम. गुण स्वभावाचा

कमलविश्व राज्यस्तरिय स्पर्धा साहित्य समूह
आयोजित
मासिक भव्य राज्यस्तरिय काव्य स्पर्धा
विषय     
         संयम
   *गुण स्वभावाचा*

  संयम  हवा जीवनी
वागण्यात बोलण्यात
आणावा तो अंमलात
सुखी होतो जीवनात

रोजच्या जीवनाला
लावा वळण संयमाचे
म्हणजे जगण होते 
सदोदित नियोजनाचे 


नदीला असतो काठ
सागरास  असे किनारा
त्यामुळे वसतात नगर
 अन  मानवास निवारा

मर्यादा दिसे निसर्गात 
म्हणूनच चाले ऋतुचक्र
जरा होता असमतोल
होते निसर्गाची  दृष्टी वक्र


 ताबा हवा मनावर
 त्यालाच  संयम म्हणती
असे  तोची महत्वाचा 
सुखी होण्या जगती
  

वैशाली वर्तक
अहमदाबाद

मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०२२

असाच यावा पहाट वारा \उनाड वारा शब्दचित्र लेखन\! गार वारा कविता पिसाट वारा

कल्पतरू जागतिक साहित्य मंच
आयोजित
दशपदी काव्य
विषय - असाच यावा पहाट वारा

सोनसळी किरणांची उषा
देते मनास नवीन आशा

थंड वा-याची मंद झुळुक.                            
करी सदैव मना उत्सुक



पक्षी करीती किलबिलाट
करी प्रसन्नतेची पहाट

मंद स्वरात ऐकू भुपाळी
मंगलमय मन सकाळी

असाच यावा पहाट वारा
मरगळीस नसेची थारा

अनुभवावी अशी पहाट
पहावा तिचा अनोखा थाट


वैशाली वर्तक

शेतकरी साहित्य मंच
आयोजित उपक्रम क्रमांक ६८
४\१\२३.                                             वर्ल्ड व्हिजन टाईम्स मधे



                                                 

विषय ..उनाड वारा
  
फिरत होते रानमाळी
करी उल्हासित थंड वारा
देई स्फुर्ती तना मनाला
आनंददायी  निसर्ग सारा 

डुलत होती रोपे ,तरु
वा-याच्या लयीत तालात
भासे पर्णे वाजवी टाळ्या
मन गुंतले  रम्य निसर्गात

क्षणात आला *उनाड वारा* 
पहाता पहाता सुसाट झाला
खट्याळ दावी खट्याळपणा
कशी सावरू मी पदराला

मन पडले विचारात
थंड मंद झुळूक कशी
वाटे सदा हवी हवीशी
कानी कुजबुजते जशी

फिरत राहिले रानमाळ
रान फुले फुललेली मोहक
हसून जणु खुणावी डोलत
  रंगी विविध चित्त वेधक


 

वैशाली वर्तक
अहमदाबाद

####################################################
विश्व लेखकांचे 
शब्द चित्र लेखन 
विषय ... खिडकीतून येणारा वारा

    श्रावण महिन्याचे दिवस होते. रजेचा दिवस त्यामुळे सारे कसं निवांत चाललं होते.
सकाळ चा चहाचा कप घेऊन बसले.  अलवार रेशीम पावसाच्या सरी पडत होत्या.
मी समोरच्या खिडकीतून येणारी थंड झुळूक अनुभवत व चहाचा मधे घोट घेत होते.
वा-याची थंड मंद झुळूक मनाला प्रसन्नता देत होती. 
     थंड वा-या सोबत खिडकीतून हळुच डोकावणारी जुईची फांदी जणू वा-यास आत ये  असे खुणेने सांगत होती. व  नाजूक पांढऱ्या फूलांचा सुगंध दरवळत होता. किती सुरेख. निसर्ग रम्य वातावरण चा अनुभव येत होता. 
    खिडकीतून पहाता छोटी रोपे वा-याच्या तालावर डुलत होती. जणु काही घरात लावलेल्या गाण्याचा  संगीताचा ताल साधत होती. रोपांची पाने आनंदाने टाळ्या वाजवित होती. 
  खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यांमुळे निसर्ग निर्मित वातावरण झाले होते. मी पण या वा-यावर जाम खुश झाले. पण मधूनच वारा त्याचा खट्याळ पणा दाखवित होता.  खोडकर वारा पुन्हा पुन्हा माझा पदर सावरण्यात त्रस्त करत होता. आणि भाळीच्या लाडिक बटांना पुन्हा पुन्हा सावरण्यात माझा चहा थंड होत होता.
     तेवढ्यात जोराची पावसाची सर आली . व मला खिडकी बंद करावी लागली . वारा खिडकीवर थाप देत राहिला.
     

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद

[20/12/2021, 8:16 pm] Vaishali Vartak: कल्याण डोंबिवली महानगर समूह2
आयोजित 
उपक्रम
काव्य लेखन 
विषय - गार वारा


 तप्त ग्रीष्मात हवासा वाटे
 थंड   गार गार वारा
स्पर्शता सुख अनुभवे
झुळुक रूपात न्यारा

  गार वारा  सोसायट्याचा
वाहे येता वर्षाधारा
मुजोर वारा छळे ललनास
पदर सावरता उठे शहारा

थंड गार वारा शरदातला
झोंबता अंगास भासे थंडी
सहज करी आठवण 
घाला गरम कपडे बंडी

   समुद्र किनारी  गार वारा
वहात येई लाटांवरी
 करीता गुजगोष्टी लाटांशी
  प्रसन्नता देई किना-यावरी


ऊन्हाच्या झळा साहूनी
 शीत वा-याचा घेण्या सहारा
सुसह्य करण्या   भासे गरज
वातानुकुलचा थंड वारा

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित 
उपक्रम अष्टाक्षरी काव्य लेखन 
विषय ..आला अवखळ वारा 
 शीर्षक   *पिसाट वारा*


 होते बसले अंगणी
आली झुळूक वा-याची
किती पहा अलवार 
भासे मना उल्हासाची

मन पहा हर्षे  कैसे 
संतोषिले क्षणभर
तप्त जीवाला भासले
दिला मोद खरोखर .

क्षणी  बदलले रूप
वारा जाहला पिसाट
तरू  भासती  हासरी
 हास्य  ते खळखळाट 

खाली पडलेली पाने
फेर धरूनी नाचती
वाहे अवखळ वारा 
लोट धुळीचे उडती

त्रस्त करीता जिवाला
जीव नकोसा जाहला
वाटे कसे मी सावरू
माझ्या साडी पदराला.

वैशाली वर्तक 




गीत...... माझ्या भारत देशाचा.

देशभक्ती गीत  माझ्या भारत देशाचा, मला  सदा अभिमान प्राणाहून असे  प्रिय, तयाच्या  गौरवात शान भाव वसे समतेचा ,धर्म नांदती अनेक नसे भेद- भाव जन...