बुधवार, २० मे, २०२६

विषम जाती प्रकारात. वृत पतितपावन व पादाकुलक. माझी शाळा

फक्त वृत्त बध्द कविता उपक्रम 
बुधवार 20/5/26
विषय शाळा
पतितपावन +पादाकुलक विषमजाती. प्रकारात 

          माझी शाळा 

जाता येता  सदैव दिसते माझी शाळा  मज 
दृढ निश्चयी  उज्ज्वल भविष्य घडविण्या मान तिज.     धृवपद

 दैवत  समान , आहे मजला,
 नाही वदते शब्दे शाळा.   
  ज्ञान वाहिनी  ती आम्हाला 
  माझ्या मनात राहिली तीच
जाता येता  सदैव दिसते माझी शाळा  मज 

आत्मनिर्भर  सक्षम करुनी
 गोड शब्दात  समजावूनी 
केले आम्हा सकळा ज्ञानी
भाव जपियले अंतरी तेच
जाता येता  सदैव दिसते माझी शाळा  मज

अजून स्मरते,  बोल स्तुतीचे
 मन मोदभरे , कला गुणांचे 
मान वाकते,  बहुमानानी
मधुर स्मृती आहेची निज 
जाता येता  सदैव दिसते माझी शाळा  मज


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटाचे पाणी

काव्य स्पंदन राज्यस्तरीय 2 आयोजित झटपट काव्य लेखन स्पर्धा 2 विषय   पाटाचे पाणी शीर्षक  शिवारी स्थान निवांताचे देश आपला कृषी प्रधान  करावी ला...