मंगळवार, २० एप्रिल, २०२१

शोधू आंनदाच्या वाटा/ धुक्यात हरवली वाट/

अ भा म सा प स्वप्नगंध समूह
उपक्रम  32
उपक्रम--- ओळ काव्य 
विषय -- शोधू आनंदाच्या वाटा
शीर्षक --  **सुखाची सकाळ**

येवो कठीण प्रसंग
धीर राखू सदाकाळ
*शोधू आनंदाच्या वाटा*
पाहू सुखाची सकाळ

निशे नंतर पहाट
करी मना प्रफुल्लित
दुःखा नंतर प्रमोद
हेच घडे सदोदित

दिन रोजचाच नवा
करा उत्कर्षे साजरा
पहा सांजवेळी मग
होई चेहरा हासरा

करु आशांचा उदय
उजळेल जग सारे
जाता नैराश्य मनीचे
वाहे चैतन्याचे वारे

क्षण हे पण जातील 
नवे लागतील शोध
*शोधू आनंदाच्या वाटा*
ऐकू  संताचे ते बोध.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद




शब्दांकुर साहित्य  समूहउपक्रमासाठी
*धुक्यात हरवली वाट*
     
    *धुक्याची वाट*
आले रवीराज नभी
दूर करीत  धुक्याची
शाल तलम  नभीची
सोनसळी शलाकांनी

जरी आभा पसरल्या
धुक्यात हरवली वाट
दूरवर दिसत नसे
सकाळचा रम्य थाट

चालत होते दूरवर
वाहे मंद शीतल वात
पक्षी गण पण विसरले
झालेली रम्य पहाट

अशा मंद धुंद  समयी
दवबिंदु  पानोपानी
 गुज सांगती पर्णांना
हळुवार  मनोमनी

मधेच हलकी सर 
 हळुवार  पावसाची
हरवलेली वाट दिसे
दूर  करिता  धुक्याची

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सर्व धर्म समभाव लोकशाही साहित्य मंच आयोजित उपक्रम
विषय. दाटले धुके आसमंती

दिन  आलेत थंडीचे
 दिसेनात रविराज
झाकोळले नभ सारे
वेगळाच आज साज

पांढरट धुसर शाल
 अवनीने पांघरली
मधेच घडे दर्शन रवीचे
धुक्यात वाट हरवली

दव बिंदू पानावर
भासे जणु मोती माळ
थंड झुळुक वा-याची
शहारली सकाळ

चाले सुंदर खेळ रवीचा
पहा निसर्गाची महती
अलवार उमलती कळ्या
गंध  दरवळे आसमंती


वैशाली वर्तक
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...