हरिभगिनी ८-८-८-६
देऊळ
बालपणीच्या आठवणीचे मंदिर होते रघुपतिचे
संथ वाहत्या नदी किनारी भासे मज मंगलतेचे
देऊळाच्या मागे होती आम्रतरू अन् वनराई
सारवलेल्या अंगणातुनी झाडलोट ही नित होई
मंगलकारी लयेतसुस्वर विठ्ठल गीते जन गाती.
भक्तजनांचा मेळा भजनी भक्ती मयी होत जाती
कधी पथिकही क्षणिक येउनी विसावताती खांबाशी
कधी मनोगत कोणी सांगे विठुराया-रखु माईशी
आज न तेथे राहिले जुने देऊळ काय मंदिरते
एका धनिके देवालयची केले रुपे दिसण्याते
जुने खांबची जाता तेथे रत्नजडित ते खांब .दिसे
जणु मिणमिणत्या दिव्याठिकाणी लखलखित दीपमाळ वसे
गोपुरी नक्षी अन कळसावर भव्यदिव्य ध्वजा आहे ,
राऊळाची शान पाहुनी, क्षणभरी मनी, मोद वाहे.
पण एक खंत मनात राहे , तीरावरचे, का अवचित
ते न' जाणता रघुपति नावे, धनिका नामे ते प्रचलित.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा