शनिवार, १४ फेब्रुवारी, २०२६

गझल.....मंजुघोषावृत गझल (२)

मंजुधोषा वृत्त 
गालगागा गालगागा गालगागा


केवढा तो  कहर केला  भूल आहे 
आज माझी बोलण्याची  चूक  आहे 

मान्य करते कोण तेव्हा .आत आले
कोण होता  सांग मजला ठावूक आहे 


फार काही  छान घडले का कळेना
मी उगाची   का अशी   भावूक आहे 

गाव सारा झोपलेला गाढ रात्री 
मंद दीवा (दीपक )तेवता अंधूक आहे

कोण मागे मध्यरात्री खावयाला 
जाग येता बाळ बोले भूक आहे



मंजूघोषा वृत्त  सायबर क्राईम पेपरात ३\३\२६


वेळ माझ्या  जीवनाचा वाचते  मी   
हेच माझे सांगण्याला जागते मी

सोबतीने चालण्याची हौस माझी 
खूप आशा  बांधलेल्या  तोडते मी

अंतरीला लागलेले  शब्द सारे 
वेदनांना *काळजातच*  दाटते मी. 

  *खेळ मांडू* जीवनाचा सोबतीने. 
हेच माझे शब्द तुजला बोलते मी

चांदराती चालण्याची मौज वाटे  
चंद्र तारे यात नाते जोडते मी

वैशाली वर्तक


######################
 

 वृत मंजुघोषा

सांजवेळ 


नाम घ्यावे राघवाचे लाभ दायी
आत्मशांती  लाभणारे . सांजवेळी 

रोज लावू  सांजवाती मोद भारी वाटे
 हर्षदायी भासणारे  सांजवेळी 

 मंद समई  तेवणारी पाहताना 
 भाव सारे हर्षणारे सांजवेळी 

कष्ट सारे दूर होती ज्योत बघता
दीप ज्योती लावणारे सांजवेळी.      

राघवाचे गीत गाता वेळ झाली 
अंतरीचे भाव आले सांजवेळी 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माया.

काव्य स्पंदन राज्यस्तरीय स्पर्धा 02 काव्यलेखन स्पर्धा  प्रकार अष्टाक्षरी  विषय माया शीर्षक... मायेची पखरण माया असते आईची कधी न होता आबाळ अहो...