अभा म सा प ठाणे जिल्हा 2
13/4/22
विषय -आधार
आधार
आधी आठवती मायबाप
शब्द उच्चारता *आधार*
सहजतेने उचलती दोघे
प्रेमाने कुटुंबाचा भार
लहानाचे मोठे होण्यास
लागतोच जीवनी आधार
गुरुजन करीतात मदत
बनविण्यास कर्तबगार
वेलींना पण लागे आधार
नसतात त्या बलवान
घेती घाव वृक्षाकडे
तरारण्या वाढण्या वेगवान
नियमच असे सृष्टीचा
घेत देत आधार एकमेका
चाले जीवन सृष्टी सदा
नसे कोणा एकाचा हेका
खरा आधार तर विश्वंभरचा
करता करविता तोची एक
तोची घडवितो तारितो
तया विणा न चाले क्षण एक
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा