मागते मी 17/8/18
सहज आला विचार मनीं
काय मागावे तुज कडूनी
कितीही दिधले मजलागी
अंतच नसे त्या हव्यासाशी
तरी मागणे मागते तुजपाशी
शक्तीच दे तू सदा मजला
येता कधी प्रसंग बाका
हाका येती मदत करण्या
मातृभुमीची लज्जा राखण्या
शक्ती मागते मी तुजला
जग रहाटे आहे सदा विकट
भरलेले मोह मायाचे दृष्ट साप
क्षणा क्षणाला ग्रासती मनास
न गुंतण्या त्या मोह पाशात
सुबुद्धी मागते मी तुजपाशी
तूच असशी करिता करविता
तू आहे पाठीशी सदा-सर्वदा
तुझ्यावरील ह्या विश्वासाला
कधी न डगमळू दे माझ्या मना
दृढविश्वास मागते मी तुजला
न मागता सर्व दिधले मजलागी
न उरते आता काही मागण्यासी
तरीही मागणे उरतेच बाकी
न पडो तुझा विसर कधी काळी
मागणे मागते मी तुजपाशी
वैशाली वर्तक
सहज आला विचार मनीं
काय मागावे तुज कडूनी
कितीही दिधले मजलागी
अंतच नसे त्या हव्यासाशी
तरी मागणे मागते तुजपाशी
शक्तीच दे तू सदा मजला
येता कधी प्रसंग बाका
हाका येती मदत करण्या
मातृभुमीची लज्जा राखण्या
शक्ती मागते मी तुजला
जग रहाटे आहे सदा विकट
भरलेले मोह मायाचे दृष्ट साप
क्षणा क्षणाला ग्रासती मनास
न गुंतण्या त्या मोह पाशात
सुबुद्धी मागते मी तुजपाशी
तूच असशी करिता करविता
तू आहे पाठीशी सदा-सर्वदा
तुझ्यावरील ह्या विश्वासाला
कधी न डगमळू दे माझ्या मना
दृढविश्वास मागते मी तुजला
न मागता सर्व दिधले मजलागी
न उरते आता काही मागण्यासी
तरीही मागणे उरतेच बाकी
न पडो तुझा विसर कधी काळी
मागणे मागते मी तुजपाशी
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा