गुरू पौर्णिमा (चाल : ओssलेके पेहला पेहला प्यार)
आली गुरु पौर्णिमा चला गुरु उत्सवा ,
जमली सारी मंदिरी भक्त मंडळी .
तूच असे आमुची, एक ती माउली,
तुज विण नसे आम्हा, मोक्षाची साउली,
तुझिया चरणी आम्ही लीन,
तुझा दास असे दीन,
तुझ्या दर्शनासाठी झालो आतुर.
आली गुरु पौर्णिमा चला गुरु उत्सवा,
जमली सारी मंदिरी भक्त मंडळी ....1
उत्सवाचे दिन मोठे, आनंदी सुखाचे,
मी,तू , माझे, तुझे सर्व विसरायाचे
ब्रह्ममय होई भक्त, दे दे तू त्यांना मोक्ष,
तुझ्या स्वरूपी कर, भक्ता विलीन .
आली गुरु पौर्णिमा चला गुरु उत्सवा,
जमली सारी मंदिरी भक्त मंडळी.............2
भागीरथी चरणी मी ठेवितो माथा ,
काय,कशी, किती वर्णू तव गुण गाथा,
बलभीम बाबांचा अवतार,त्यांचा महिमाअपरंपार
तुझा दास अविनाश करतो जय जय कार.
आली गुरु पौर्णिमा चलागुरू उत्सवा
जमली सारी मंदिरी भक्त मंडळी.......3
भागीरथीबाई वैद्य यांच्या चरणी अर्पण.
आली गुरु पौर्णिमा चला गुरु उत्सवा ,
जमली सारी मंदिरी भक्त मंडळी .
तूच असे आमुची, एक ती माउली,
तुज विण नसे आम्हा, मोक्षाची साउली,
तुझिया चरणी आम्ही लीन,
तुझा दास असे दीन,
तुझ्या दर्शनासाठी झालो आतुर.
आली गुरु पौर्णिमा चला गुरु उत्सवा,
जमली सारी मंदिरी भक्त मंडळी ....1
उत्सवाचे दिन मोठे, आनंदी सुखाचे,
मी,तू , माझे, तुझे सर्व विसरायाचे
ब्रह्ममय होई भक्त, दे दे तू त्यांना मोक्ष,
तुझ्या स्वरूपी कर, भक्ता विलीन .
आली गुरु पौर्णिमा चला गुरु उत्सवा,
जमली सारी मंदिरी भक्त मंडळी.............2
भागीरथी चरणी मी ठेवितो माथा ,
काय,कशी, किती वर्णू तव गुण गाथा,
बलभीम बाबांचा अवतार,त्यांचा महिमाअपरंपार
तुझा दास अविनाश करतो जय जय कार.
आली गुरु पौर्णिमा चलागुरू उत्सवा
जमली सारी मंदिरी भक्त मंडळी.......3
भागीरथीबाई वैद्य यांच्या चरणी अर्पण.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा