जागतिक पर्जन्य वन दिन
दि 22 \6 \25
त्रिनेत्र प्रकाश धारी
विषय...ऊन .वारा,पाऊस.वणवा पंचमहाभूते वृक्षारोपण, वनसंवर्धन विषयावर काव्यलेखन
शीर्षक.. कृपा पंचमहाभूते
सुरु होताची वैशाख
भासे ग्रीष्माचा वणवा
आग ओकितो आदित्य
लुप्त होतासे गारवा
सृष्टी दिसते उजाड
दिन येता ऊन्हाळ्याचे
सारी सृष्टीची हरिता
जाळितसे ऊन वैशाखाचे
वेळ आली आहे आता
वनांकडे देणे लक्ष
राने वने केली नाश
वृक्षारोपणाकडे झाले दुर्लक्ष
बरसत आहे सरीवर सरी
अलवार जणू रेशीम धारा
दिसते हिरवळ सर्वत्र
जणू पाचूचा पसरला पसारा.
करा तेव्हाच लगबग
लावा आपापल्या अंगणी,
रोपे नाना पुष्प भाज्यांची
होईल पहा हिरवीगार धरणी.
लावता वृक्ष सभोवती
वाढेल सुंदर पर्यावरण
शुध्द हवेचे नियोजन
आरोग्याचे करेल वर्धन
वृक्षारोपण केल्याने
मिळेल प्राणवायू आपणाला
प्रगतीच्या नावे केलीय वृक्ष तोड
आता दुःख होतय मनाला
फिरून येता रानमाळी
करी उल्हासित थंड वारा
देई स्फुर्ती तना मनाला
आनंददायी निसर्ग सारा
क्षणात आला *उनाड वारा*
पहाता पहाता सुसाट झाला
खट्याळ, दावी खट्याळपणा
कशी सावरू मी पदराला.
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा