*स्पर्धेसाठी*
सावली प्रकाशन समूह,
षडाक्षरी काव्य लेखन स्पर्धा
विषय - कृष्ण जन्माष्टमी
*गोकुळ सोहळा*
कंस काराग्रही
देवकी नंदन
आठवा जन्मला
करुया वंदन 1
वसुदेव निघे
नंदाच्या गोकुळी
यशोदेच्या घरी
यादवांच्या कुळी 2
निघाला असता
गोकुळ नगरी
चरण स्पर्शाने
नदी वाट करी 3
पुत्र देवकीचा
आता झाला कान्हा
ठेवता पाळणी
यशोदेचा तान्हा 4
पाहूनी सावळे
हसरे मोहक
कृष्णची वदती
चित्ताला वेधक 5
घरी येता कृष्ण
जन झाले गोळा
कृष्ण जन्माष्टमी
गोकुळी सोहळा 6
वैशाली वर्तक
अहमदाबाद
अखंडित कल्याणकारी काव्य
आयोजित उपक्रम क्रमांक ४६
विषय ...कान्हा गोकुळीचा
शीर्षक....गोकुळ सोहळा*
जन्मे कंस कारागृही
पुत्र देवकी नंदन
कृष्ण नामे हो वदती
करु तयाला वंदन 1
वसुदेव तयासवे
निघे गोकुळ नगरी
पुत्र चरण स्पर्शाने
नदी जल वाट करी. २
वसुदेव देवकीचा
पुत्र आता झाला कान्हा
ठेवताच पाळण्यात
यशोदेचा हसे तान्हा ३
रुप पाहूनी सावळे
त्याचे हसरे मोहक
जन कृष्णची वदती
भासे चित्ताला वेधक ४
नंदा घरी येता कृष्ण
जन नगराचे गोळा
गोकुळात जन्माष्टमी
केला गोकुळी सोहळा ५
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कृष्ण जन्म... अभंग
वसुदेव निघे / यशोदेच्या घरी/ नदी वाट करी/ होता स्पर्श
पुत्र देवकीचा / येता नंदा घरी/ आनंद नगरी / घरोघरी
रुप ते सावळे / कृष्ण ची वदती / मोदे खुणावती / यशोदेला
जन्म मथुरेला /वाढला गोकुळी/ यादवांच्या कुळी / नंदलाला
हाते कुरवाळी / खट्याळ मोहक / चित्ताला वेधक / घनश्याम
घरी कृष्ण येता/ जन सारे गोळा / जन्माचा सोहळा / साजरा तो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा