*स्पर्धेसाठी*
कमलविश्व राज्यस्तर स्पर्धा साहित्य समूह
*कमलविश्व राज्यस्तर स्टपर्धेसाठी*
विषय -- एकांत
*बोल अनुभवाचे*
सुरु होते रोजची दिनचर्या
जसे होताची सकाळ
देतो जीवाला मनःशांती
*एकांत* क्षण, सदा काळ 1
हवा हवासा वाटे मनाला
प्रत्येकाला तो एकांत
आठवणीत रमणे आवडे
म्हणूनच हवा, आधी निवांत 2
मिळविण्या ज्ञान , सिध्दी
चित्ताला एकांत हवा
होता एकचित्त , सारे विसरता
एकाग्रता देते विचार नवा 3
एकांत हवा वाटे नवयुगलांना
दोघांच्यात रममाण होण्यास
अडचण वाटे , सदैव तिसरा
क्षणिक आनंद मिळविण्यास 4
रोजच्या धकाधकीच्या जीवनी
मिळवावा लागतो निवांत
तोच झालाय फार महाग
मग कुठला मिळणार *एकांत* 5
वैशाली वर्तक
अहमदाबाद
8141427430
स्वरचित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा