*शीर्षक*- दाह शामक दुर्वा
आहे जुनी आख्यायिका
ऋषीमुनींना यज्ञकामी
अनलासूरचा होता त्रास
गणेशाने शोधली युक्तीनामी 1
गिळले गणेशाने राक्षसास
झाला दाह पोटात
ठेवता दुर्वांकुरे शिरी
गारवा पोहचला ऊदरात 2
गणेशाने आनंदाने
दिले सर्वा वरदान
सर्वाना कळले दुर्वा
दाह शामकास छान 3
आशा बहु गुणी दुर्वा
जाणा तयाचे महत्व
औषधोपयोगी म्हणून
त्यांचे आहे प्रभुत्व 4
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा