शुक्रवार, १० जानेवारी, २०२५

आई अभंग मातृदिन. ...आई

 माझी लेखणी साहित्य मंच, शहापूर जि

ठाणे आयोजित मोठा अभंग लेखन

कार्यशाळा

विषय .. मातृदिन

शीर्षक.....महिमा मातेचा 


धरूनीया बोट   |पहिले पाऊल |

  लागते चाहूल.  |  जीवनाची ||


असे जरी  स्वामी  |   तिन्ही ही जगाचा |

तो कष्टी मनाचा. |  आई विना ||


होता जीवा कधी  |दुखापत कदा |

ओठावरी. सदा |  शब्द आई ||


घटाकार देई | घटास आकार |

देतसे संस्कार|  बालकास||


मिळे स्वर्ग सुख | तिच्याच कुशीत |

मुलांना खुशीत  |सदा ठेवी ||


आई किती वर्णू | तव गुण गाथा |

नमविते माथा |  सांगे वैशू ||


            ...........वैशाली वर्तक

                        अहमदाबाद





स्पर्धेसाठी 

श्री समर्थ विचार फाउंडेशन रायगड

आईच्या पुण्यस्मरणानिमित्य काव्यात्मक आदरांजली 

 विषय...आई माझे दैवत 

शीर्षक....आई तुझ्या कुशीत*


पाय टाकताच घरी

तुला भेटण्याची घाई 

*आई* तव मुख.दिसताच

मन आनंदून जाई


सारे मिळता जगती

मन  आनंदले खुशीत

सुख स्वर्गाचे लाभले 

फक्त आई तुझ्या कुशीत 


प्रातः काळी उठताच 

काय हवे नको पाही. 

घरातील प्रत्येकाला

  ते मिळण्याची ग्वाही


करून दुर्लक्षित स्वतःस

नेहमी विचार दुजांचा

परिपूर्णता करण्यात 

कुटुंबीय  हर जनांचा.


 राहिलो मी भाग्यवान 

तीर्थक्षेत्रे तव चरणाशी 

असता तू मजपाशी 

वाटे नको जाणे काशी



शब्द पडती तोकडे

तव गुणगान गाता

शब्दांची गुंफून सुमने

आदरांजली वाहिली आता


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

8141427430




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह  उपक्रम 1391 दि 3/2/26 विषय. वही आनंदिले मनोमनी वही पाहून  सुंदर  गुज मनीचे सांगण्या  मन धावे क्षणभर  किती सुबक बा...