सोमवार, ९ जानेवारी, २०२३

पक्ष्यांची भरली शाळा


पक्ष्यांची भरली शाळा


होता झुंजुमुंज पहा
सुरु होतो किलबिलाट 
कोण सांगते तयांना
उठा झालीय  पहाट

होते बसले अंगणी
 लक्ष गेले झाडाकडे
चिवचिवाट करती पक्षी 
कोणाचे ऐकावे गडे

चिवचिव चिमण्यांची
चालू होती अविरत
त्यात पोपट मैनाची
साद आली दबकत

कावळा ओरडे कर्कश्श
गेला उडून क्षणात
म्हणने त्यांचे कोणी ऐकेना
राग आला त्याच्या मनात


करत होते किलबिलाट
रंगी बेरंगी लहान पक्षी
मधेच उडून जाती तेव्हा
नभात दिसे छान नक्षी

पक्ष्यांना एकच होता प्रश्न
थांबव ना. मानवा वृक्ष तोड
 पक्ष्यांनी  कुठे रहावे ?
करा काही तडजोड

वैशाली वर्तक
अहमदाबाद

रविवार, ८ जानेवारी, २०२३

म्हणीवरुन. सोनाराने टोचले कान

कल्याण डोंबिवली महानगर २
उपक्रम
विषय ...सोनाराने टोचले कान

कितीदा सांगावे समजवून
ऐकणे  जणू माहीत नाही 
गोडी गुलाबीने सांगितले
आता तरी ऐकतील काही


कधी येईल समज तयांना
दमदाटी पण  झाली देऊन 
उदाहरण देखिल दाखविले 
परिणाम पण झाले सांगून

जाणे योग्य सोनाराकडे
तोची असे मार्गदर्शक
अशा वेळी एकच उपाय  
 खरा तोची  प्रबोधक

ज्याचे काम तोची जाणे
 वदती   म्हणूनी    जन
 सोनारानेच टोचावे कान
 हेची सांगे मनोमन

वैशाली वर्तक
अहमदाबाद

गुरुवार, ५ जानेवारी, २०२३

लेख सुख म्हणजे काय

सुख म्हणजे ..मनाला मिळणारा आनंद. . मनाने अपेक्षा करावी ती सहज मिळावी.
म्हणतात ना हवी असलेली वस्तू व नोकर वेळेवर मिळाले तर पृथ्वीवर स्वर्ग अवतरेल.
कोणाला माहीती स्वर्गात तरी सुख आहे. त्या मुळे मानसिक आनंद मिळणारे वा
 मनाला जेव्हा खरा आनंद.मिळतो. हायसे वाटते. मन तृप्त होते. डोळे बंद करुन 
तृप्त मनाने जीव हलका होतो मन आनंदाने नाचू लागते. तेच क्षण सुखाचे क्षण.तेच असते सुख.
   आता पहाना. सर्वीस करतांना आपण उशीरा पोहचलो पण मस्टर चेकींगला न जाणे
वा  अचानक चेकींग व्हावे व नेमके त्याच दिवशी आपण शार्प वेळेवर हजर
असावे व आपले नाव लेट कमरस मधे न येणे. हो ...होते असे बरेचदा.. माझे तर नेहमी व्हायचे. लगेच स्टाफ कलिक बोलायच्या तू काय बाई लकी आहेस .   आता छान नशिब वा नशिबदार असणे ..हे पण सुखात चं येते ना.
तू सुखी आहे .नेहमी तू  वाचते. व आपण पण  म्हणजे मी पण आनंदाने खुष व्हायची.       हे झाले सुख प्राप्तीचेच  छोटं उदाहरण. अशी छोटी छोटी सुखे असतात .ती अनुभवली
 मनाने  मानली तर मनाला आनंद मिळतो व. क्षणैक सुखाचा आनंद वाटतो.
  आपण लावलेले रोप बहरावे... फुलावे..कालची कळी हसून सकाळी फुललेली पाहून
आनंददायी सकाळ झाली तर ...निसर्गाने दिलेला त्याक्षणी आनंद हेच सुख. मी तर म्हणेन... दु:ख नाही झाले.ते सा sssरे  सुखच ...
 आणि सुषमा बोलली त्या प्रमाणे काही वेदना म्हणजे  प्रसवतेच्या.  स्त्रियांना जाणीव असते पण नंतर मिळणारे मातृपद बाल्याचे मुख दर्शन अमाप सुख देतात त्या सुखा समोर वेदना पण सुखात पालटतात .आधी पासूनच मनाने ते होणारे कष्ट सुखात पालवटलेले  असतात.होतर ते सुख चं म्हणावे... म्हणजेच. काय सुख आपल्या अंतर्मनात दडलेले आहे. त्याला आपल्या इच्छेनुसार बदलवतो म्हणजे सुख. खरंतर काय सुख मानण्यात असते. समाधानात आहे.उगा का संत म्हणतात समाधानी रहा .सुखी व्हा मी माझी स्वरचित कविता सादर करते.सुख म्हणजे काय याची माझी कल्पना..   क्षण सुखाचे*
क्षण सुखाचे शोधावे
भरलेल्या  जीवनाते
आनंदाने सदा जगा
बहरतील ते क्षणाते
       पहा ऊषा उजळली
        घेत नव्या आशेचा  साज
         क्षण सुखाचे वेचावे
          आनंदाचा लावूनी ताज
होता मना सारखे वाटे
सुख आले माझ्या  दारी
 उपभोगा क्षण सुखाचा 
मनी समाधाने वाटे भारी
       ऊषे नंतर येता निशा
      टिपूर चांदणे मोहविते मन
      लुटा अनामिक आनंद 
      वाटती ,हे पण सुखाचे क्षण
भरले हे जग मोदाने
नको  उदासिनता मनात
मोद विहरतो चोहीकडे
मिळतात क्षणसुखाचे  क्षणात

वैशाली वर्तक

शनिवार, ३१ डिसेंबर, २०२२

हे वर्ष अमृताचे

*स्पर्धेसाठी*
कमल विश्व राज्य स्तरीय साहित्य समूह आयोजित
डिसेंबर 2022 मासिक भव्य राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा
31/12/2022
विषय ..हे वर्ष अमृताचे



खरच दोन वर्षे कोरोनात
किती लोक गेली जीवानिशी
 धंदा पाणी बंद टाळेबंदीने
 भेट-गाठ नाही आप्तेष्टांशी 


 पण *हे वर्ष ठरले अमृताचे*
  पूर्ववत जन जीवन सारे
उद्योग धंद्यात आली गती  
 नव चैतन्याचे वाहिले वारे

 कथन साने गुरुजींचे
ख-या अर्थाने ठरले उचित
 जाहला बलसागर भारत
विश्वात शोभला खचित

स्वराज्य प्राप्तीचा अमृत काळ
देश जाहला आत्म निर्भर
साजरा करीती हर्ष उल्हासे
स्वावलंबनाचे झरे देशभर 


विसरूनी जातीभेद  सारे
समजून  घेत नव्याने समतेला
संतानी ही  पसायदानातून  
 दिलेला मंत्र  देऊ  जनतेला

वैशाली वर्तक
अहमदाबाद

शुक्रवार, ३० डिसेंबर, २०२२

वय मधुर रसाळ

सिद्ध साहित्यिक समूह
आयोजित
*स्पर्धेसाठी*
विषय.. वय मधुर रसाळ


नवा दागिना लाभला
येता चाळीशी जवळ
किती शोभितो तुजला
जन वदले केवळ

तेज दिसे प्रौढत्वाचे
केस पांढरे ग्वाही देती
बोल अनुभवाचे माझे
सहजतेने कामी  येती


मुले गुंतली विद्यार्जनी
स्व- छंद जतनाचा काळ
धीर गंभीरता मनी
*वय मधुर रसाळ*

प्रेम भाव राखूनी मनी
 घेतले  निर्णय उचित
सौख्य दिधले कुटुंब जना
संसार वेल खुलविला खचित

वैशाली वर्तक
अहमदाबाद

मंगळवार, २७ डिसेंबर, २०२२

तुझ्या विश्वात रमताना // परमेश्वराची प्रेम शक्ती

एकलव्य काव्य मंच
आयोजित
काव्यलेखन
विषय.. तुझ्या विश्वात रमताना 

सोनसळी किरणांची 
रोज करितोस ऊषा
येते देवा तुझी सय
मिळतात नव्या आशा

रुप पाहूनी अथांग
निर्मिलेल्या सागराचे
एक विशाल आभाळ
दिले विश्व बंधुत्वाचे .

ऋतू चक्र   घडवून 
आनंदाची पखरण 
सूर्य चंद्र तारे नभी
करी  तुझी आठवण.

बरसता जलधारा
होते वसुधा हरित
तुझी सय करी मना 
सदाकाळ प्रफुल्लित 


तुझ्या  आठवांचा खेळ.     
आहे या जगती न्यारा
तूची घडवीशी तोडीशी
जगातील पसारा सारा

तुझ्या विश्वात रमताना
झाली आयुष्याची संध्याकाळ
कसे दिन सरले जीवनी
हेच न कळले  कदाकाळ

वैशाली वर्तक
अहमदाबाद

                        

                                              

परमेश्वराची प्रेम शक्ती
  
  असे त्याची प्रेमशक्ती
  अगाध ती जगतावरी
 त्याचीच आपण लेकरे
 कृपा दृष्टी ठेवी सर्वांवरी

 
 
ठेवा दृढ विश्वास देवावर
 करा जीवनी सत्कर्म नित्य
  दया भाव ठेवा हृदयी
 येतो तोची मदतीस हे सत्य

  
जनांनी टाकल्या  जलात
तुकारामांच्या  गाथा
 अपार भक्ती  विठोबावर
तारिता टेकविला माथा

 कबीर करी भक्ती रामाची
 सदा राही लीन भजनी
 प्रेम भावे विणले शेले 
 दृढ श्रध्दा तयाची जीवनी

  श्रध्दा ठेवा परमेश्वराची
  सदा राही उभा पाठी
  दृढ विश्वास असता मनी
धाव घेई सदासाठी


रविवार, २५ डिसेंबर, २०२२

अष्टाक्षरी. तुझी आठवण येते

सायबर क्राईम पेपरात १४\४\२६



भव्य राज्यस्तरिय स्पर्धा क्रमांक ११
नशनल लायब्ररी वांद्रे व्हीजे मुंबई यांच्या विद्यमाने
सावित्रीबाई फुले रात्र शाळा
स्पर्धा क्रमांक ११
विषय ..तुझी आठवण येते
   *आठवण तव कृपेची*

सोनसळी किरणांची 
रोज करितोस ऊषा
येते देवा तुझी सय
मिळतात नव्या आशा

रुप पाहूनी अथांग
निर्मिलेल्या सागराचे
एक विशाल आभाळ
दिले विश्व बंधुत्वाचे .

ऋतू चक्र   घडवून 
आनंदाची पखरण 
सूर्य चंद्र तारे नभी
करी  तुझी आठवण.

बरसता जलधारा
होते वसुधा हरित
तुझी सय करी मना 
सदाकाळ प्रफुल्लित 


तुझ्या  आठवांचा खेळ.   
आहे या जगती न्यारा
तूची घडवीशी तोडीशी
जगातील पसारा सारा

वैशाली वर्तक
अहमदाबाद

अभंग. पैसा

 सिद्ध साहित्यिक समूह  मोठा अभंग  विषय .. पैसा  असताना पैसा | तुकविती मान | करीती सन्मान.|  जनामधे || पैसा हवा तर   | महेनत हवी. |   शोधा यु...