एकलव्य काव्य मंच
आयोजित
काव्यलेखन
विषय.. तुझ्या विश्वात रमताना
सोनसळी किरणांची
रोज करितोस ऊषा
येते देवा तुझी सय
मिळतात नव्या आशा
रुप पाहूनी अथांग
निर्मिलेल्या सागराचे
एक विशाल आभाळ
दिले विश्व बंधुत्वाचे .
ऋतू चक्र घडवून
आनंदाची पखरण
सूर्य चंद्र तारे नभी
करी तुझी आठवण.
बरसता जलधारा
होते वसुधा हरित
तुझी सय करी मना
सदाकाळ प्रफुल्लित
तुझ्या आठवांचा खेळ.
आहे या जगती न्यारा
तूची घडवीशी तोडीशी
जगातील पसारा सारा
तुझ्या विश्वात रमताना
झाली आयुष्याची संध्याकाळ
कसे दिन सरले जीवनी
हेच न कळले कदाकाळ
वैशाली वर्तक
अहमदाबाद
[15/02, 12:01 am] Vaishali Vartak: परमेश्वराची प्रेम शक्ती
असे त्याची प्रेमशक्ती
अगाध ती जगतावरी
त्याचीच आपण लेकरे
कृपा दृष्टी ठेवी सर्वांशी
ठेवा दृढ विश्वास देवावर
करा जीवनी सत्कर्म नित्य
दया भाव ठेवा हृदयी
येतो तोची मदतीस हे सत्य
जनांनी टाकल्या जलात
तुकारामांच्या गाथा
अपार भक्ती विठोबावर
तारिता टेकविला माथा
कबीर करी भक्ती रामाची
सदा राही लीन भजनी
प्रेम भावे विणले शेले
दृढ श्रध्दा तयाची जीवनी
श्रध्दा ठेवा परमेश्वराची
सदा राही उभा पाठीशी
दृढ विश्वास असता मनी
धाव घेई सदासाठी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा