शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०

पुन्हा नव्याने. ... दीप लावू सकारात्मकतेचा

यारिया साहित्य  कला समुह
उपक्रम
दशपदी काव्य
विषय -- पुन्हा  नव्याने

 स्वदेशीचा लावुया नारा देश होण्या आत्म निर्भर
 पुन्हा  नव्याने वाहुद्या झरे, स्वावलंबनाचे देशभर

मशाल देऊ तेजाळून ,देशाच्या प्रगतीला तारक
वाचवू मुलीला भृण हत्येचे, न करिता पातक

नसे कोप  निसर्गाचा ,पर्यावरण जतनाची मशाल
करुनी वृक्षा रोपण , वाढवूया निसर्गाची  ढाल

 विश्व शांतीची  मशाल, तेजाळू  द्या संस्कृती ची
नांदावी सुखशांती  जगात, अशाच  उदात्त  भावनेची

 विसरूनी जातीभेद ,समजून  घेऊ नव्याने समतेला
संतानी  पसायदानातून  , दिलेला मंत्र  देऊ  जगताला

वैशाली वर्तकस्पर्धेसाठी

स्वप्नगंध साहित्य समूह आयोजित स्पर्धा 
दिवाळी विशेष स्पर्धा क्रमांक 3
 स्पर्धा विषय..एक सकारात्मक दिवा
 शीर्षक ..  *नव चेतना*

दिवा  दूर करीतो तिमीर 
 दावितो नवी आशा  जीवाला 
 प्रतिक असे  सकारात्मकतेचा
 दिवाळीत तेजाळू दिपकाला.          1

 स्वदेशीचा लावुया दीप.
देश   करण्या आत्म निर्भर
 पुन्हा  नव्याने वाहु द्या वारे
 स्वावलंबी  होईल देश भराभर.       2

 तेजाळून देऊ मशाल
देशाच्या प्रगतीला तारक
वाचवून  मुलगी, भृण हत्येचे  
कधी  न करिता पातक.        3

दिवा लावू विश्व शांतीचा 
तेजाळूया समई संस्कृतीची
नांददल सुखशांती  जगात
विशाल उदात्त  भावनेची.   4

 विसरूनी  जाता जातीभेद ,
समजून घेऊ नव्याने समतेला,
ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचा, 
दिलेला मंत्र  देऊ  जगताला.      5

वैशाली वर्तक
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...