रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

आजची स्त्री खरचा सुरक्षिता आहे का

आजची स्त्री  खरच सुरक्षित व  स्वतंत्र  आहे
     आजची स्त्री  शिक्षीत झाली आहे .त्यामुळे तिला वैचारिक स्वातंत्र्य  प्राप्त झाले आहे. शिक्षणाने तिला वैचारिक मत प्राप्त झाली आहेत. .तसेच शिक्षणामुळे तिला नोकरी करुन घरास मदत रूप होता येते. आर्थिक  मदत कुटुंबास करु शकते. पण
हे सारे झाले तरी आपली संस्कृती  ही पुरुष  प्रधान आहे .त्यामुळे अजून ही स्त्री  पूर्ण  स्वतंत्र  नाही . सुशिक्षीत समाज झाला तरी टक्के किती ? अजून ही पुरुषांचे घरात चालते. जरी पुरुष पण आता सुधरला आहे तरी घरात पुरुषांचेच चालते .भले स्त्री  घरचे... अगदी सर्व  कामे ..व्यवहार  ...कुठे पैसे गुंतवायचे ?अशी आर्थिक  व्यवहार पहात असेल ...तिला त्यात स्वातंत्र्य  असेल .अगदी घरचे सर्व  कार्यक्रम  
ती बिनधास्त स्वतःच्या बळावर  करून घेत असेल , आणि जरी त्यात पुरुषाचा कार्यभाग वेळे अभावी कमी असेल .तरी  पण शेवटी पुरुषांचे महत्त्व  ध्यानी घेतले जाते.  महत्त्व  पुरुषांचेच असते. त्यांचे पुरुषत्व टिकूनच असते. 
आणि आजवर तू मुलगी आहे जपून हसणे ..बोलणे ही बंधने असतात व स्त्री  पण त्या वळणाच्या बाहेर येऊ शकत नाही. तिच्या वर झालेले संस्कार  तिलाच बाहेर निघू देत नाही. 
       तिला स्वातंत्र्य  आहे ती स्वतंत्र  आहे तरी मनाने मात्र  स्त्रीला तिची उणीव  तिला  जाणीव करुन दिली जातेच.  तसेच काही वेळा स्त्री च स्त्री ची शत्रू  पण असते .एका स्त्री ला दुस-या स्त्री चा उत्कर्ष पाहवत नाही. मग घराततून पण बंधन येऊ शकते. व तिच्या स्वतंत्रतेवर घाला घातला व  आणला जातो. 
        स्वतंत्र तेचा तर प्रश्न आहेच तसेच सुरक्षित पण नाही.  अजून समाजात घडत असलेले प्रकार पाहून सुरक्षित पणाला पण धोका आहेच. नाही तर निर्भया सारखे प्रसंग घडले असते का? निर्भया सारख्या अनेक नारी त्यांच्या प्राणाल्या मुकल्या आहेत. .
       तरी स्त्री  आता सुरक्षिततेचे शिक्षण घेऊन  स्वतःला प्रबळ बनवत आहे. एवढेच काय सीता रमण सारख्या एका स्त्री ने संरक्षण मंत्री चे पद भुषविले आहे तरी समाजाची प्रवृत्ती  अजून बदलली नाही . 
     खर पहाता आपल्या संस्कृती प्रमाणे स्त्री  ला देवीच्या रुपात पहावे ...जिथे स्त्रीची पूजा होते तेथे देवते चा वास असतो. देवता रहात असते. असे सांगणारी संस्कृती  असून  शिक्षणाचा प्रचार अजून कमी त्या मुळे पुरुषांच्या वा समाजाच्या विचारांना बदलण्यास वेळ लागणार .

.......वैशाली वर्तक.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...