नशीब
असेल हरि तर देईल खाटल्यावरी
म्हणत निवांत विसंबतो नशिबावरी
पण नशीब -नशीब म्हणजे तरी काय ?
प्रयत्ना अंती मिळणारी यशाची खाण.
न करिता शिकस्त प्रयत्नांची
लाभते का कधी साथ नशीबाची?
परिश्रमाने घडवावे लागते नशीब,
मग मिळते शाबासकी, नशीबा-माथी.
कधी कोणास मिळते चिमूटभर
तर कोणास मिळते ओंजळभर
ते तर असते, संचित कर्म-फळ,
तयासाठी लागते गंगाजळी सत्कर्म.
म्हणती वृषभ रास असे नशीबवान,
चुकले का तयांना ,दुःखाचे पहाड.
देवत्व पावून पण, कृष्ण अन् राम
सुटली नाही दुःखाच्या नशीबाची पाठ.
नैसर्गिक आपत्तीत दगावतात माणसे
तर देवाच्या कृपेने तरली लहान अर्भके.
तिथे म्हणावा खेळ असे नशीबाचा
न करिता सायास जीव वाचण्याचा
घडायचे ते घडणार , ते नाही चूकणार
विश्वास हवा बाहूं वर, नको हस्तरेखांवर
अन् ठेवावी सदा दृढ श्रध्दा देवावर
मग नशीबाने होते कृपा-दृष्टी, आपणावर.
वैशाली वर्तक. शब्दरजनी साहित्य समूह
विषय -- नशीब
नशीब नशीब म्हणजे काय
असेल हरि तर येईल खाटल्यावरी
म्हणत निवांत विसंबतो नशीबावरी
नाही प्रयत्ना अंती मिळणारी यशाची खाण हाय
परिश्रमाने घडवावे लागते नशीब
तेव्हा लाभते साथ नशिबाची
न करिता शिकस्त प्रयत्नांची
मग प्रयत्ने मिळते शाबासकी नशिबामाथी
कधी कोणास मिळते चिमूटभर
हे असते संचित कर्म फळ
तर कोणास मिळते ओंजळभर
नशिबी लागते गंगाजळी सत्कर्माचे बळ
विश्वास हवा बाहूबळावर नको हस्त रेखावर
अन् ठेवावी सदा दृढ श्रध्दा देवावर
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा