सिध्द साहित्यिका समुह आयोजित
उपक्
ओळ काव्य- **कळी कळी बहरली**
जलधारा बरसता
वेली लता बहरल्या
पानो पानी दिसे कळ्या
लाजूनी सकाळी हसल्या
निसर्गाने केली जादू
रिमझिम पडता पाणी
रोपे डौलती डवरूनी
वा-यासंगे गाती गाणी
तरारली हिरवी पाने
बूट्टे लेवून रंगीत
कळ्या पुष्पात फुलता
आसमंत झाला गंधीत
मोहक दिसे उधळण
बूट्टे हिरव्या साडी वर
भासे सजली वसुंधरा
भेटता तिचा प्रियकर
किमया वर्षा ऋतू ची
कळी कळी बहरली
फूल पाखरे भिरभिरत
फुलांशी कुजबुजली
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा