प्रणू चाराक्षरी साहित्य समूह आयोजित
सप्तरंगी महास्पर्धा
फेरी क्रमांक 4
पंच महा भूते
पंचतत्व
एकत्रित
असतात
सदोदित 1
भूमी एक
तत्व असे
जिच्या वर
सृष्टी वसे 2
निर्मीलीस
तूच देवा
पंचभूते
आम्हा ठेवा 3
जल तत्व
अनमोल
जाणा सदा
त्याचे मोल 4
जला साठी
दूर दृष्टी
तेव्हा दिसे
रम्य सृष्टी 5
पंचतत्वे
असताती
देव रुप
मानताती 6
सूर्य चंद्र
झळकती
सृष्टी वर
प्रकाशती 6
जीवन ते
नसे शक्य
वायु विणा
ते अशक्य 7
पंच तत्व
मूळ भूते
असे सारी
महा भुते 8
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा