गुरुवार, १३ ऑगस्ट, २०२०

धुंद वारा

यारिया साहित्य  कला
आयोजित  काव्य लेखन उपक्रम
विषय- धुंद वारा

आला धुंद  गंधित वारा 
 हळुच स्पर्शे तन मनाला
गेले मन ही  वाहत तया संगे
आठवणीत त्या माहेराला
        फूललेली ती रातराणी
        गंध तिचा आला मनोमनी
       धुंद वा-याने जाग्या केल्या 
        बालपणीच्या त्या आठवणी
फिरले धुंद वा- याच्या-सवे
नदी काठच्या मंदिरात
ऐकले मंद स्वर एकतारीचे
सहज मन रमले भजनात
          धुंद वारा कानी कुजबुजला
           पहा  खेळ शशी तारिकांचा
           लुकलुकत हसती नभी चांदण्या
            वा-या संगे खेळ रमला रात्रीचा
सुखावून गेला क्षणभर
धुंद वारा माझ्या  मनाला
किती सुंदर  पहा निसर्ग 
देतो आनंद सा-या जगाला
............वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वही.

मोहरली लेखणी साहित्य समूह  उपक्रम 1391 दि 3/2/26 विषय. वही आनंदिले मनोमनी वही पाहून  सुंदर  गुज मनीचे सांगण्या  मन धावे क्षणभर  किती सुबक बा...