प्रणू चाराक्षरी साहित्य समूह आयोजित
सप्तरंगी महास्पर्धा
फेरी क्रमांक 3
विषय--चतुर्भुज
चार हात
असे ज्याला
चतुर्भुज
वदे त्याला 1
चार कोन
चार भुज
वदतात
चतुर्भुज 2
दोन जीव
चार हात
जीवनात
मिळे साथ 3
गणेशास
चार हात
चतुर्भुज
म्हणतात 4
चतुर्भुज
येता घरी
मोद होई
क्षणभरी 5
एक भुजे
लाडू असे
तीक्ष्ण दृष्टी
पहातसे 6
लग्न होता
कानी आला
चतुर्भुज
आता झाला 7
गुन्हा होता
चतुर्भुज
ऐकू येते
कुजबुज 8
होता लग्न
चतुर्भुज
मनी वाटे
मोद तुज 9
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा