उपक्रम
यारिया कला समुह आयोजित
माझ्या गावाची पायवाट
माझे गाव आहे डोंगराच्या कुशीत. अगदी डोंगर पायथ्याला . डोंडर फार उंच नाहीत 2/4 टेकड्या. वस्ती फार नाही
सर्व घरे छोटी पण टुमदार कौलारु.
बस मधून येत असता शहर सोडले व गावा चा रस्ता धरला की वेगळीच मौज वाटते. दोन्हीही बाजूस झाडे तैनातीला उभी असल्या सारखी. मधेच खळखळ वहाणारा ओढा. त्या ओढ्या वरचा तो लाकडी पूल . पावसाळ्यात तर ओढ्याला भरपूर पाणी. त्यात मधून च मुले मनसोक्त पाण्यात डुंबत असतात. पुढे मग वळणाचा रस्ता. अजून डांबरी रस्त्या न झाल्याने भरपूर धुळीचे लोट उडतात. त्या वळणावर आलो की आपोआप हात तोंड व डोळे धूळी पासून वाचण्यासाठी हात रुमाल घेउन झाकण्या साठी जातोच.
पुढे रस्ताच्या बाजुला हिरवी शेते .मका, गहू, ज्वारी ची शेते सिझन प्रमाण डौलत असतात .वा-याच्या झुळूकेवर हलणारी शेते. वा-या बरोबर शेतात हिरवी लाट यावी अशी मस्त हलतांना दिसतात. मधेच मोटेचे पाणी वहात जात असल्याने मंजुळ पाण्याचा आवाज येतो.
पुढे आंब्याची झाडे मधेच हिरवी गार दिसतात. अमराई तून जाताना , धनदाट नवराई मुळे गारवा जाणवतो. कोणी वनराईत दुपारचे जेवण करुन पहुडलेले असतात. पक्ष्यांची गोड किलबील ऐकू येते. जवळ बांबूचे वन. त्यातून वारे वाहीले की बाबूंच्या पानांची सळसळ ऐकू येते.
सर्व निसर्गाचे दर्शन घेत .निसर्गाची अनुभुती घेत गावाच्या वेशी वर येतो रस्ता.
तेथे छोटे देऊळ . ते पण नदीच्या तटावर. नदीच्या तटावर बांधलेले देऊळ आले की घर आले समजायचे.नदीच्या तीरावरचे देऊळ मांगल्याचे प्रतिक भासते. मग छोटी कौलारु घरे येतात. डोंगर जणु गावाच्या रक्षणास उभे आहेत असे वाटते.
असा वळणे घेत निसर्गातून गावचा रस्ता येतो.
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा