रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

सर सर पाऊस पडतोय रे

काव्य स्पंदन   समुह 02 राज्य स्तर
ओळ  काव्य लेखन स्पर्धा 

सर सर  पाऊस पडतोय रे
झर झर ओहळ वाहताती रे

नभातून बरसल्या जलधारा
मृदगंध पसरवे थंड वारा
ओधळल्या मोतियांच्या सरी रे
खळखळ ओहळ वाहताती रे          1

दाटले अंबर काळ्या मेघांनी
दामिनी चमके रुपेरी रेघांनी
झाकोळलेल्या नभी दडे सुर्य रे
खळखळ ओहळ वाहताती रे             2

जागोजागी भरे खाच्यातून पाणी
नाचत खेळू गात पाऊस गाणी
ओंजळ भरुन धारा फेकुया रे
खळखळ ओहळ वाहताती रे             3

रान माळ हिरवे गार चहुकडे
नृत्य वनी मयुराचे पाहु गडे
इंद्रधनुची  कमान नभात  रे
खळखळ ओहळ वाहताती रे            4

सर सर  पाऊस पडतोय रे
झर झर ओहळ वाहताती रे
      
                       ...........वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...