रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

चित्र काव्य ( जलधारा)

चित्र  काव्य
स्पर्धेसाठी
शीर्षक --जलधारा


घर कौलारु खेड्यातील
पहा शाकारले  किती  सुंदर 
वेगळेच  आकर्षण  तयाचे
भासे नयनी चित्र  मनोहर.

मेघांनी भरलेले  अंबर
कोसळती झर-झर धारा
चिंब भिजल्या वृक्ष  वेली
झाली हिरवीगार  वसुंधरा

ओधळता मोतीयांच्या सरी
मृदगंध  पसरला दरवळूनी
तृप्त  भिजल्या वेली अलवार
वृक्षांना गेल्या त्या बिलगुनी

 जलधारांना झेलत  नाचे रमणी
  झाले प्रसन्न  तियेचे तन-मन
  पसरवूनी अपुल्या  दोन्ही  करांना
  देते असे पावसास आलिंगन 

  अशा अल्हाददायी समयी
  आठव येते सखयाची मनी
  काहूर  जमे आठवणींचे
  धावत  यावे तयाने या क्षणी.

वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...