मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२०

तुज नमो क्रांति वीरा

काव्य स्पंदन 02
*तुज नमो  क्रांति वीरा**
 अष्टाक्षरी  ओळ काव्य

ध्येय  स्वातंत्र्य प्राप्तीचे
मनी तयांच्या रुजले
जन जागृती करण्या
दिन रात्र  ते जगले

जिद्द  होती स्वातंत्र्याची
मिळवीन ते स्वातंत्र्य 
हक्क  दावी इंग्रजांना
घालविण्या पारतंत्र

त्याग देशभक्ती हीच 
कामे धरुनीया हाती
क्रांति वीर ते लढले
देत प्राणांची आहुती

समाजाची सुधारणा
याचा मार्ग  शिक्षणात
शाळा राष्ट्रीय  काढल्या
ज्ञान देण्यास जनात

दुर्लक्षित तो संसार
स्वातंत्र्याचा मनी ध्यास
तुज नमो क्रांति वीरा
जन्मभर एक आस

वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...