गुरुवार, १३ ऑगस्ट, २०२०

श्रावणी छटा दशपदी (काव्य प्रकार)

काव्य स्पंदन राज्य स्तरीय समूह 02
काव्य प्रकार -- दशपदी
विषय -- श्रावण  छटा
          **ऋतू  हिरवा**
येता श्रावण वसुधा होई हिरवी गार
जलधारांनी रुप  जाहले बहरदार

श्रावणाची ही छटा  आवडे मना मनाला
सृजनता दिसे सृष्टी तून क्षणा क्षणाला

पानोपानी कळ्या डोकवी हसती लाजूनी
उमलूनी झाली  फुले, नव आशा घेऊनी 

सर्वत्र  दिसे एकची तो , वसुधेचा रंग
 रुप  तिचे पाहून ,आनंदात सारे दंग

छटा सृष्टीची ही,  वाटे भरावी नजरेत
कवी शब्दात ,चित्रकार साकारी कलेत

   वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...