गुरुवार, १३ ऑगस्ट, २०२०

अष्टाक्षरी ओळकाव्य माझ्या मनाचे उन्हाळे

सिध्द  साहित्यिका समूह
उपक्रम अष्टाक्षरी
 **माझ्या  मनाचे उन्हाळे**

जरी मानिले जीवन
खेळ हा सुख दुःखाचा 
पण राहिला सदाची
ग्रीष्म हा सदाकाळचा

  नाही उरला ओलावा
  उसवले प्रेम धागे
  झाले नकोसे जीवन
 अर्थ हीन  जीणे मागे

    दिसण्यास  एकत्रित 
    लवलेश न प्रेमाचा
    ओढ नुरली मायेची
   अर्थ नसे जीवनाचा

आस धरेला मृगाची
तृष्णा ती जलधारांची
संपलेल्या ओलाव्यास
ध्यास जल वर्षावाची

अपेक्षांची झाली राख
नाही सुखाचे शिंपण
**माझ्या  मनाचे उन्हाळे**
निराशेचे  ते लिंपण

.........वैशाली वर्तक.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...