शुक्रवार, २० मार्च, २०२६

पिवळे पान / पिकले पान

पिकले पान

पिवळे पान ,पांढरे केस
असती दोन्हीही समान. एकसमान 
ऊन पावसाळे साहिलेले
जयांना मिळे सदा मान

  जैसे पर्णांचे  पिकणे
  नियमच असे सृष्टीचा
बाल्य ,तारुण्य , वृध्दत्व
हाची क्रम आयुष्याचा

किती सहजतेने पर्ण
येते गिरक्या घेत भूवरी
घेते विसावा खत म्हणूनी
पुन्हा  फुलवण्या धरेवरी

वृध्दांच्या जीवनातील
मिळालेले अनुभवाचे बोल
नव पीढिला ठरे मार्गदर्शक 
 जाणावे सदा त्याचे मोल

पिकल्या पानांनी पण
गाऊ नये सदा इतिहास
सद्य काळ तितकाच कौतुकाचा
 पहातआनंदे वाढवा त्यांचा उल्हास

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सोमवार, १६ मार्च, २०२६

वृत्त बध्द कविता. वृत्त हरिभगिनी 8.8.8.6

हरिभगिनी ८-८-८-६

देऊळ
         

बालपणीच्या आठवणीचे  मंदिर होते    रामाचे
संथ  वाहत्या नदीच्या तटी भासे मज मंगलतेचे

देऊळाच्या मागे होती आम्रतरू अन् वनराई
सारवलेल्या अंगणातुनी  झाडलोट ही नित होई

 सुर सनईचे सुमधुरतेने  विठ्ठल गीते  जन  गाती.       
भक्त जनांचा मेळा भजनी  भक्तीत रंगून जाती
 
कधी  पथिकही  .क्षणिक येउनी.विसावताती खांबाशी
कधी मनोगत  कोणी  सांगे  विठुराया-रखु माईशी 
                              
आज  न तेथे राहिले जुने देऊळ काय मंदिरते  
एका   धनिके देवालयची  केले रुपे  दिसण्याते                
        
जुने खांबची  जाता तेथे रत्नजडित ते खांब .दिसे
जणु मिणमिणत्या  दिव्याठिकाणी लखलखित दीपमाळ वसे      

गोपुरी नक्षी  अन  कळसावर भव्यदिव्य ध्वजा आहे  ,
राऊळाची शान पाहुनी, क्षणभरी मनी,  मोद वाहे.       

पण एक खंत मनात राहे , तीरावरचे, का अवचित                          
ते न' जाणता ! नावे, धनिका नामे ते प्रचलित.

#################################################


बालपणीच्या आठवणीचे  मंदिर होते   रघुपतिचे
संथ  वाहत्या नदीच्या तटी भासे मज मंगलतेचे

देऊळाच्या मागे होती आम्रतरू अन् वनराई
सारवलेल्या अंगणातुनी  झाडलोट ही नित होई

कोणी सुमधुर  स्वरातुनी विठ्ठल गीते  जन  गाती.    
भक्तजनांचा मेळा भजनी  भक्तीत रंगून जाती.    
 
कधी  पथिकही  क्षणिक येउनी विसावताती खांबाशी
कधी मनोगत  कोणी  सांगे  विठुराया-रखु माईशी 
                              
आज  न तेथे राहिले जुने देऊळ काय मंदिरते  
एका   धनिके देवालयची  केले रुपे  दिसण्याते                
        
जुने खांबची  जाता तेथे रत्नजडित ते खांब .दिसे
जणु मिणमिणत्या  दिव्याठिकाणी लखलखित दीपमाळ वसे      

गोपुरी नक्षी  अन  कळसावर भव्यदिव्य ध्वजा आहे  ,
राऊळाची शान पाहुनी, क्षणभरी मनी,  मोद वाहे.       

पण एक खंत मनात राहे , तीरावरचे, का अवचित                          
ते न' जाणता रघुपति नावे, धनिका नामे ते प्रचलित.

शुक्रवार, १३ मार्च, २०२६

गझल. ... आनंद कंद

 झरणी अशी फुलावी   माझ्यात जाण आली

 स्मरता गुरू विजोंना, काव्यात जाण आली


देऊन बोध मजला, केले अता  लिहीते

घेताच कष्ट थोडे, तंत्रात जाण आली.


रागे भरे न होता, केले मला शहाणे

आता करीन लेखन,  तर्कात जाण आली.


घेऊन रोज शाळा, होतील गझलकारा

आहेच नाव त्यांचे, हर्षात जाण आली


वंदून शारदेला,  नमितेय मी  सरांना

मदतीस हात लाभो ,    गझलेत    जाण आली. 


वैशाली वर्तक

शनिवार, २८ फेब्रुवारी, २०२६

आजही आठवतो एकेक शब्द

 आजही आठवतो एकेक शब्द



दिले संस्कार  आईबाबांनी.           दिले   संस्कार   गुरू जनांनी.       ८_८

आपणास  जे बालपणी.               आपणास बालपणी.  ६_६

अजूनी आठवितात  शब्द-शब्द.     अजून आहे स्मरणी शब्द. ८_८

  ध्यानी रहाते शिकवण मनी.         स्मृत़ीच्या.   जडावणी.  ६-६

                                               

माती सम गोळ्याला जयांनी.    गोळा होता जणु मातीचा. 8-8

बनूनी उत्तम  शिल्पकार.           होत तुम्ही शिल्पकार  6-6

घडविले सर्वोत्तम  शिल्प.        सर्वोत्तमी. शिल्प घडविले ८-८

ध्यानी  तयांचे उपकार.          मनी सदा राही उपकार 


 दिली  घेतलेली  वचन

घेऊनी हात हाती विश्वासाने

शब्द न् शब्द अजूनी स्मरते

पूर्ण  केलीत दोघांनी सहर्षाने


 शब्द मातेचा ठेविला जपूनी

 करिता गृहप्रवेश सासरी

लाभले सुखद सहजीवन

भरल्या प्रेमाच्या घागरी



वैशाली वर्तक 


बुधवार, २५ फेब्रुवारी, २०२६

वृत्त बध्द कविता \\चंद्रकांत\ पतितपावन कविता( २)मनीषा,बचत ८-८-८-२

फक्त वृत्त बध्द कविता उपक्रमा साठी 
आशय ओळी विजोंच्या

वृत्त चंद्रकांत/पतितपावन ट
8-8-8-2
शीर्षक. ...मंनिषा


अशी दिवाळी, एके वेळीं,    व्हायची साजरी
पोरे जाता, परदेशाला,  खेद दाटे उरी

चार दिवस घर, गजबजलेले, गप्पात रंगती
काका काकू, आत्या मामा, आप्त जन जमती

रोजच नवीन  मिरवित कपडे  पहा कसे नटती
आनंदाला उत्साहाला  सदैवची भरती

पोरे रमली, देश सोडला, घर ओके  पडले
ज्येष्ठच आता एक एकटे , घरोघरी उरले.

आता उरल्या  गत काळाच्या आठवणी मनी
परत फिरावे मायभुमीला आशा मनोमनी

वैशाली वर्तक
********************************************* 
अहमदाबादचंद्रकात \  पतितपावन
मात्रा ८-८-८-२
*बचत*
 
  थेंबेथेंबे ,तळे साचते   आहे ना ध्यानी                                               
  रोज रूपया,  बचत करावा, जाणीती  ज्ञानी
                                         
  बालपणीला अंगिकारली संचय करण्याची 
  कामी येते  बचत उद्याच्या भविष्यकाळाची

 अशाने पहा, लागते सवय, अपव्यय टाळणे
 भविष्यातल्या, व्ययाची सहज तरतूद पाहणे
                              
  बचत  ती पहा   येता कामा ,  वाटले हायसे 
  फायदेशीर ठरतेय बचत खाते अनायसे

  छोट्या  मुंग्या , कशा पहा ना, अन्न  करी गोळा
 पावसाळ्यात  सर्वत्र पाणी,भुगर्भी सोहळा       

वैशाली वर्तक

मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०२६

बचत seveing

शब्दरजनी साहित्य समूह 
आयोजित चित्र काव्य 
विषय .. चित्र काव्य 
शीर्षक...आजची बचत


थेंबे थेंबे तळे साचे 
ठेवा सदा ध्यानात 
रोज  रूपया बचत करिता 
मोठी रक्कम होईल भविष्यात.


लहानपणीच अंगिकारावी 
बचतीची  सवय नित्य
 भविष्यात मोठ्या खर्चासाठी 
कामास येते , हेच सत्य 

अशीच लागते सवय
फालतु खर्च टाळणे
उद्याच्या खर्चाची  सहज
 बचतीने तरतूद करणे .

बचत येता कामास 
किती वाटते हायसे
आजची केलेली बचत
 खर्च-रक्कम काढते अनायसे.

 मुंग्या पहा ना कशा 
अन्न कण करतात गोळा
पावसाळ्यात पाणी सर्वत्र 
अन्न कोठारात करीती सोहळा

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद
२\८\२५

गुरुवार, १९ फेब्रुवारी, २०२६

लवंगलता वृत्त गझल ८-८-८-४

गझल कार्यशाळा उपक्रम क्रमांक 4
वृत्त लवंगलता
मात्रा 8-8-8-4=28
रदीफ.. बाकी काही नाही 
अलामत --आ

 
वैशाली वर्तकवृत्त लवंगलता 
8-8-8-4

 गुरू जनांच्या आधाराने बाकी काही नाही         
प्रयत्न केले आनंदाने  बाकी काही नाही. 

काय मिळाले  काय गमविले  हिशोब याचा बघता.
 सदैव जगलो व्यवहाराने बाकी काही नाही. 

मार्ग न दिसता निराश होणे माहित नाही मजला.
 मेहनतीच्या. (आत्मबळाच्या)  कर्तृत्वाने  बाकी काही नाही  

केंव्हा केले सत्कार्य कोणा माहित नाही 
जगा सांगतो अभिमानाने बाकी काही नाही 

गळता पाने बघवत नाही उजाड राने सारी
 आता नटली वैविध्याने बाकी काही नाही   

बोलआठवा गुरू जनांचे येतात सदा कामी
होते प्रगती संस्काराने बाकी काही नाही.


वैशाली वर्तक

शनिवार, १४ फेब्रुवारी, २०२६

मंजुघोषावृत गझल (२)

मंजुधोषा वृत्त 
गालगागा गालगागा गालगागा


केवढा तो  कहर केला  भूल आहे 
आज माझी बोलण्याची  चूक  आहे 

मान्य करते कोण तेव्हा .आत आले
कोण होता  सांग मजला ठावूक आहे 


फार काही  छान घडले का कळेना
मी उगाची   का अशी   भावूक आहे 

गाव सारा झोपलेला गाढ रात्री 
मंद दीवा (दीपक )तेवता अंधूक आहे

कोण मागे मध्यरात्री खावयाला 
जाग येता बाळ बोले भूक आहे



मंजूघोषा वृत्त  सायबर क्राईम पेपरात ३\३\२६


वेळ माझ्या  जीवनाचा वाचते  मी   
हेच माझे सांगण्याला जागते मी

सोबतीने चालण्याची हौस माझी 
खूप आशा  बांधलेल्या  तोडते मी

अंतरीला लागलेले  शब्द सारे 
वेदनांना *काळजातच*  दाटते मी. 

  *खेळ मांडू* जीवनाचा सोबतीने. 
हेच माझे शब्द तुजला बोलते मी

चांदराती चालण्याची मौज वाटे  
चंद्र तारे यात नाते जोडते मी

वैशाली वर्तक


बुधवार, ११ फेब्रुवारी, २०२६

जीवनातला सुखद क्षण

सिद्ध साहित्यिक समूह आयोजित 
उपक्रम 
विषय. आयुष्यातला एक सुखद आठवण

एक सुखद आठवण
शोधणे काम कठीण 
मनाने आहे समाधानी 
सा-या  जीवनी दु:खच क्षीण

तरी आठवण करिता 
 मन धावले भुतकाळात
पहिले  राज्य तरणपदक
मिळविलेला क्षण आठवात 

पुढे क्षण सहजीवनाचे
जात आहेत सुखद
मनाजोगत्या सुखी जीवनी
उपभोगले आजी पद

सुखद क्षण दिले लेखणीने
आमंत्रित करून अ.भा सा संमेलनात 
लेखणी होता देखणी
निवृत्त काळ जातोय हर्षात.

तरी बृहन्महाराष्ट्र संमेलनात 
झालेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार 
जीवनातला सुखद क्षण
करितो जीवन सदा हर्ष साकार

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

सोमवार, ९ फेब्रुवारी, २०२६

पादाकुलक वृत्त. (6). 1पहिली वही. पहिली कविता) 2क्षणाक्षणा3..4..पानगळ.

 
विश्व लेखकांचे साहित्य मंच पुणे प
आयोजित दोन दिवसीय उपक्रम 
9/2/26

(1)

विषय ...पहिली वही
पादाकुलक वृतांत


सहज काढला ,आवरायला
निवांतात खण ,फडताळाचा
हाती आली, रोज टिप्पणी 
हर्ष मिळाला, गतकाळाचा

उचलुनी वही, घेता हाती
भरभर टिपली , सारी पाने
दिसली मजला, माझी कविता 
वाचन केले, आनंदाने 

जागी झाली, जुनी आठवण
पहिली वाचक , होती आई
तिने  तोंड भर कौतुक केले 
तिला दावण्या माझी घाई.

  हसू  वाचुनी आता येते
लिहिली कैसी , मला कळेना
भाव मनीचे, कसे उतरले
अजून मजला, ते उमजेना 

नीट लावले  कपाट सारे
पण दिन सरला, आनंदाने 
 ताज्या झाल्या  आठवणी त्या 
उजळा दिधला् आवरण्याने..

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

(2 )

२९\१\२६
वृत्त..पादाकुलक
    क्षणा क्षणाने

 काळ पुरुष तर, चाले अविरत 
उषा आजची न येते परत

दिवस आजचा,संपेल क्षणी.     
गत काळाची, सय नको मनी

क्षण न पाहतो, रंक व राजा
कधीच न करी , गाजावाजा ,

सुखी क्षणांना , झणी लुटूया,
क्षण जो आला ,मौज करूया. 
 
 क्षण सरताची,उल्हासाचा 
तोची पुन्हा.  न परतण्याचा 

                  
निसटे वाळू,  . हातामधुनी
क्षणही सरतो  जीवनातुनी.               

दिवस आजचा,हा सोन्याचा 
विचारच नको,काल उद्याचा    


वैशाली वर्तक 
 अहमदाबाद


(3)
पादाकुलक

नाही भरवसा क्षणाचा


 आहे अगदी खरेची कथन

 नसे भरवसा कधी क्षणाचा

 निसटते जशी  रेत   हातची

वेळ हा सरे आयुष्याचा


  येईल खचित  उद्या  दिवाकर

  शुभची सकाळ  करण्या  मंगल

   तोच आजचा सुख शांतीचा

आला क्षणची करण्या चंगळ


   दिन तर सरती   क्षणा क्षणाला 

   नको रहाया मनात आशा 

   नसे भरवसा कधी क्षणाचा

   नकोच पदरी उगी निराशा

  

देवे दिधला. जन्म  मानवी

विचार करण्या असेची मती

 बहाल करिता  मेंदू त्याने

वाढव आता कामात गती


   काळ हातचा क्षण भाग्याचा

 नको पहाणे वाट उद्याची

 गवसत नाही दुसरी संधी

ही खरी असे  रीत यशाची. 

वैशाली वर्तक


( 4..)

वृत्त पादाकुलक

(पद्मावर्तनी समजाति)

मात्रा८-८=१६


  शीर्षक.माझे मला कळेना



समोर दिसता  रोज टिप्पणी     

मनात आले विचार काही 

करून वंदन  सरस्वतीला

लिखाणास मन उत्सुक राही


 शब्द मनीचे  झरू लागले

 ओवत गेले  मी शब्दांना 

 सहज जाहली तयार कविता 

झरू लागता शब्द फुलांना.           


मलाच माझे नाही कळले

कशी प्रसवली मजला कविता 

पठण करूनी पुन्हा पाहिली 

जना भावली माझी रचिता 


देत चालना कल्पकतेला  

 नेहमी स्फुरे  पहा लेखणी.

छंदच जडला आता मजला

झरणी माझी  दिसे देखणी


विचार येता शब्द गुंफता

शब्दकार मी कशी जाहले

नित्य लिहीणे सराव घडिता.

मलाच माझे नाही कळले


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

 (5.)   शिव शंकरा


पादाकुलक

    शीर्षक.    शिव शंकरा

आज शंकरा ,  तव नामाचा
महिमा   गर्जे ,  मुखी निरंतर 
करूनी तुला   वंदन सारे
तुझिया नामें चालला गजर.     1

कैलासीचा,  असशी  राणा
जटेत गंगा , तूची धारी 
उमा पती तू ,त्रिनेत्र देवा
भव भय व ताप , दुःखे हारी.   2

भक्ती भावे, करण्या पूजन
देऊळी जन, झाले गोळा,
वाहण्यास तुज, त्रिदली पाने
अपूर्व भासे. आज सोहळा.        3. 

आला धावत उदधि मंथनी
तूची देवा , विष प्राशियले 
कंठ जाहला  , रंगे नीळा
नीळकंठची ,नाम जाहले.         4 

आवड तुजला, . नृत्य कलेची
तांडव नृत्यी , त्रिशूळ धारक.
संकट येता ,  तव भक्तावर
तूची त्यांचा होशी तारक.           5


वैशाली वर्तक 
अहमदाबा
पानगळ     पादाकुलक ८-८

ऐकू आली  सहजच कानी
 पानोपानी  हलके सळसळ
 शोभा गेली तरूलतांची
सुरु होताची पहा पानगळ

होता पाने   रंगे पिवळी
जागा देती हिरव्या पाना
नियमच असतो या सृष्टीचा 
होतच नाही   खेदची  मना.   


 घेता घेता गिरक्या पाने   
 पडती खाली जमीनीवरी
 मिळून जाती  मातीमध्ये 
 खत होवूनी  मग काम करी


शरदात पहा  दिसे  पानगळ
मरगळ भासे  तरू लतावरी
पाचोळ्याचा   पिवळा पिवळा
रंग सांडला  जणु भुमीवरी


ऋतुराज पहा वसंत येता.      
  सरली आता   सारी मरगळ 
   बहरती तरू परत नव्याने  
   विसरुन जाती   तरू पानगळ   

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

भग्नावशेष आठोळी रचना

माझी लेखणी साहित्य मंच शहापूर जिल्हा ठाणे अंतर्गत 
आंबोळी साहित्य मंच आयोजित स्पर्धेसाठी 
दि ८\२\२६

विषय .. भग्नावशेष 
शीर्षक..जपणुक संस्कृती 

उत्खलनात  मिळतात 
भग्नावशेष अनेक मूर्ती 
ज्यामुळे  सहज कळते
त्याकाळची संस्कृती 

पुरातन वस्तू संशोधन 
यांचा असतो हाच ध्यास 
करिते नेमकं हेच काम 
  शोधून काढणे  जुना इतिहास 

वैशाली वर्तक 
 अहमदाबाद

गुरुवार, २९ जानेवारी, २०२६

आनंद कंद वृत्त. देव पाहिला कविता

देवास पाहण्याची ,होती मनात इच्छा 
 बाल्यास हासताना , पाहून पूर्ण मनीच्छा

देता भुखी जनाला, खाण्यास अन्न पाणी 
हासून पाहिलेला   होताच चक्रपाणी .

 येता नभी दिवाकर , होते नवीच ऊषा
घडते दर्शन त्याचे, देतो नव्याच आशा


फुलती कळी पहाता, गंधाळली क्षणाते.    
भरिला  सुगंध पुष्पें,  किमया दिसे मनाते


तोची असे  सुरेश,  सृष्टीत भेट घडते
सारीच जादु त्याची, दिनरात  नित्य करते.

बुधवार, २८ जानेवारी, २०२६

मी कोण कविता

मोहरली लेखणी साहित्य समूह 
विषय...मी कोण 

मी कोण असे पुसता
प्रश्न ..अस्तित्व,वा स्व ओळखीचा
मी,आहे तुमच्यातील सारस्वत
छंद जडलाय लेखणीचा

आहेत साहित्य समूह अनेक 
जतन करण्या मायबोली 
देत-घेत विचारांना चालना
रचिते रोज चार ओळी 

होते खरी तरणपटू, बेंकर 
निवृत्तीत  छंद जडला लेखणीचा 
अन् अविभाज्य स्थान तिज लाभता
मान मिळाला कवियित्रीचा


अ.भा साहित्य संमेलनी आमंत्रित 
कवि कट्टयावर सादरीकरणासाठी 
 भेटूया साता-यास आपण
सारस्वत भेटीचा आनंद घेण्यासाठी 

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

रविवार, २५ जानेवारी, २०२६

लेख. स्वतःला व्यक्त करणे गरजेचे आहे

विषय---  स्वतःला व्यक्त करणे गरजेचे आहे

अगदी बरोबर कथन आहे . जो पर्यंत  आपण आपले विचार मांडत नाही तोवर समोरच्यास कळणार कसे. ? आपल्या मनात काय विचार  आहेत ते. विचार  सांगणे ..बोलणे ..नीट सविस्तर  सांगणे गरजेचेच असते .सगळेच काही मन कवडे नसतात की आपल्या मनातील शब्द न् शब्द जाणून घेतील.
       घरात ठीक आहे .आपले भाव, जाणतील....भावना जाणतील . ...आपला जोडीदार  सहवासाने  आपली मते  मनाचे विचार  जाणेल .पण ते काही हद्दे पर्यंत.  मग तर शब्दांची ..वाच्यतेची गरज ही कुठेही .कुठल्या ही क्षेत्रात  असतेच.
       आपण व्यक्त झालो तरच आपला विषय ..आपली मते..आपले मार्गदर्शन 
व्यक्त होऊनच सांगू  शकतो. आपली मते पटविण्यासाठी व्यक्त होणे गरजेचे ठरते. 
हो! व्यक्तता वाचाळ ,.बडबड नसावी की ज्यामुळे समोरच्याला ऐकण्यात रस च रहाणार नाही. मुद्दे सुद व्यक्त  झाले पाहिजे. 
        यथा योग्य व्यक्त होणे.. वाच्यता करणे महत्वाचे आहे. नाहीतर वेळ टळून जाता मग बोलणे कवडी मोलाचे ठरते. आणि मग आपल्यावर रडण्याची म्हणजे,
अरे ! हे तर मला माहित  होते, पण.......  माझे बोलणे व्यक्त होणे राहिले. असे होता कामा नाही. 
         वकील डाॕक्टर यांच्या समोर तर व्यक्त होणे अत्यंत गरजेचे. न व्यक्त  होता त्यांना आजार कसा कळणार . म्हणून तर लहान बालक आजारी होतात त्यांचे डाॕ.
वेगळे असतात. कारण बालक बाळ व्यक्त होऊ शकत नाही . आणि म्हणून तर म्हणतात  की, डॉक्टर व वकील यांच्या शी नीट खरे खरे व्यक्त व्हा.  
         व्यक्त नुसते बोलूनच नाही तर सारे आपण सारस्वत  आपल्या लेखणीतून व्यक्त होतो. आपले मनीचे गुज लिखाणातून मांडतो.व आम जनते समोर व्यक्त होतो. या व्यक्ततेचे  म्हणजे स्वतः ची मते प्रदर्शित करणे आहे. याचा समाजास पण फायदा होतो. आता नाही का !कोरोना  काळात  लाॕकडाऊन काळात लिखाणातून बरेच संदेश देऊन व्यक्त झालोत. जन जागृती केली . पोलीस  संरक्षक तसेच 
परिचारिका,  डाॕक्टर,  सफाई कामगारांची स्तुती सुमने शब्दातून  उधळून लेखणी व्दारे व्यक्त झालो त.    तर व्यक्त होणे स्वतःचे  व्यक्तव्य करणे  फायदेशीर असतेच. 
    तसेच स्वतः व्यक्त झाल्याने शरीरास पण फायदेशीर  असते. मनातल्या मनात  विचाराने कुढत बसणे ..दुस-यास न सांगता गप्प रहाणे याचा मनावर पण परिणाम होतो .स्वभावावर परिणाम होतो. मनावर ताण येऊन शरीरास हानी पोहचू शकते. 
स्वातंत्र्य वीर व्यक्त झाले नसते तर स्वातंत्र्य  कसे प्राप्त झाले असते. संतांनी व्यक्त होऊन आपल्यास सुखी जीवनाची अध्यात्मक वाटचाल कशी करवली असती.
    जीवनाचे सार  गीतेचा   बोध.. जो  कृष्णाकडून  मिळाला .. तो व्यक्तच झाला नसता तर  कसा जगताला मिळाला असता. 

.....वैशाली वर्तक

शुक्रवार, २३ जानेवारी, २०२६

नजर

सहज झाली नजरा नजर
अन् भरली  थेट मनात
सावरली    लाडिक बट 
भावली तुझी अदा क्षणात

लागले   जीवास वेड   
सतत तुजला   "पाहणे"
होता  जरा नजरे आड
शोधिले  भेटण्या बहाणे

 असे. नजर कटाक्ष 
प्रेमाची एक ती भाषा
भाव मनीचे उमजण्या
वसे मनात   आशा

करी नजरेने घायाळ 
खेळ चालता प्रेम रंगी
उमलती भावना हृदयी
प्रेमिकांच्या अंतरंगी

 पहाता सकाळी हरीच्या 
नजरेतले प्रेमळ भाव
 जातो दिवस सुखाचा 
कसा गेला नसे ठाव

वैशाली वर्तक 

बुधवार, २१ जानेवारी, २०२६

ती न संपणारी कविता

शब्द रजनी साहित्य समूह 
विषय ..ती एक न संपणारी कविता 
21/1/26

आहे खरच तू अशी
सदा  चाले अविरत 
नसे ठावुक थांबणे 
धावे सदा अखंडित 

 शांत बसता उपवनी 
 पाहूनी पर्णे डोलती 
 भासती जणु मनात 
हर्षे टाळ्या वाजवती.

सवय जडली अंतरंगी 
 करु सदा शब्दाविष्कार
हर क्षणी देती उपमा
भाषेतील शब्दालंकार


 विषयाची नुरते गरज
 वेळ प्रसंग देती विषय
शब्दांना गुंफता काव्यात 
लक्षात घेतेच आशय


नाते जडले लेखणीशी 
झालेय जीवन कविता 
 करण्या तिज अजून देखणी 
राहो ती सदा प्रवाहिता

वैशाली वर्तक 
अहमदाबाद 
21/1/26

रविवार, १८ जानेवारी, २०२६

खेळ

 मोहरली लेखणी साहित्य समूह 

17/1/26

विषय.. खेळ

   


खेळ म्हणता आठवे

दिन ते बालपणीचे 

कधी सांजवेळ होता  

घरी जाणे नावडीचे


किती ते खेळ असती

 खोखो कबड्डी  लंगडी

शारीरिक ऊर्जा देई 

एकत्र होता सवंगडी


 होते शरीर सौष्ठव 

शिकवण देती खेळ

द्यावी साथ एकमेका

जमवाया हवा मेळ


पत्ते सापशिडी गोटया

असती बैठकी   खेळ 

सारे खेळ खेळण्यात

मजेत जातो ची वेळ 


जीवनात  महत्त्वाचे

स्थान असे खरोखर 

खेळ खेळत जगावे

मोद मिळे निरंतर 


वैशाली वर्तक 

अहमदाबाद

गुरुवार, ८ जानेवारी, २०२६

विविधा वर्धापन दिनानिमित्त

 चिरंतर राहो विविधा 


दिन असे आनंदाचा

करु साजरा मिळूनी

देउ  विविधेस शुभेच्छा

आनंदाने  काव्यातूनी



विविधा आलीय यौवनात 

भासे जणु  नव तरूणी 

नाव तिचं घेता ओठी

 शोधण्या नसे कुठेच उणी



तिचाच समूह  तो *सांगते ऐका*

व्यक्त होतात  सख्या बोलून

कल्पना शक्तीला मिळे चालना

वकृत्व गुणास  देतो उजळून 


*अभिव्यक्ती* दुजा आणिक

जिथे होते  गुणांचे दर्शन

गायन, वाचन ,संस्कृती जतन

विविध रंगी कला प्रदर्शन 


*Only विविधा मिटींग* समूह 

पहा    ते शिस्तबद्ध आयोजन 

 देतो कार्यक्रमाच्या सूचना 

 गुणगान गातात *विविधाचे* जन

 


आज  तिच्या वर्धापन दिनी 

किती गाऊ गुण गान

झालीय विख्यात अहमदाबादमधे

वैविध्यपूर्णतेत तिजला मान




वैशाली वर्तक 

अहमदाबाद 

3/1/26


पिवळे पान / पिकले पान

पिकले पान पिवळे पान ,पांढरे केस असती दोन्हीही समान. एकसमान  ऊन पावसाळे साहिलेले जयांना मिळे सदा मान   जैसे पर्णांचे  पिकणे   नियमच असे सृष्ट...