अभ्यास
विषय प्रेम मिलन
आसुसली वसुंधरा तृप्त केली वरुणाने
मिलनाने मातीचे संतोषिले डोहाळे पाण्याने
वसुंधरा अंकुरली. बीजकणे तरारली
जणु अवनी नव वधु सम लाजूनी हर्षीली
रुप पहा कसे दिसे नयन रम्य धरणीचे
जणु हिरवे दिसताती आकर्षक गालीचे
संतुष्टता वसुंधरा वरुणाला भेटूनी
वृक्षलता तरारल्या हर्षिल्या जल पिउनी
वैशाली वर्तक
आसुसली वसुंधरा तृप्तीली. वरुणाने.
डोहाळे अवनीचे पूर्तीले पाण्याने .
वसुंधरा अंकुरली बीजकणे तरारली
जणु अवनी नवनवरी लाजूनी हर्षीली
रूप पहा कसे दिसे नयन रम्य धरणीचे
जणु हिरवे दिसताती आकर्षक गालीचे
उल्लासित वसुंधरा वरुणाला भेटूनी.
वृक्षलता तरारल्या हर्षील्या जल पिउनी
पहा धरा पावसात भिजूनिया सजली.
प्रीतीच्या जलधारे नववधु सम ती नटली
लावण्वात वाढ करी इंद्रधनु हळु मागे.
अवनी अन गगनाचे प्रीतीचे ते धागे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा