शुक्रवार, १९ जून, २०२६

वृत्तबद्ध उध्दव. मात्रा 2-8-4. कविता उध्दव

फक्त वृत्तबद्ध कविता उपक्रम
वृत्त उद्धव 
मात्रा 2-8-4
ओढ जीवा

भेट आपुली ती पहिली.    
मन  माझे अगतिक पळभर
माझ्या विचलित या जीवा
तूची सावरले    क्षणभर


अन भासला  प्रथम भेटी
आश्वासक  संपर्क मजला
जाहला आनंद हृदयी 
 तू भासे  गाली हसला

छंदची लागला आता
अन कसे आवरु.मजला
तव सहवासाची गोडी 
मज वेडे करी   जिवाला



गंध तव प्रीति चा तो
अंतरी  माझिया  राहे
बघ वसंत फुलतो राया
आनंदे ऊरी  वाहे        

वैशाली वर्तक 
अहमदाबाद             

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वृत्तबद्ध उध्दव. मात्रा 2-8-4. कविता उध्दव

फक्त वृत्तबद्ध कविता उपक्रम वृत्त उद्धव  मात्रा 2-8-4 ओढ जीवा भेट आपुली ती पहिली.     मन  माझे अगतिक पळभर माझ्या विचलित या जीवा तूची सावरले ...