शनिवार, ६ फेब्रुवारी, २०२१

सुनीत काव्य रचना ओंजळ फुलांची

शब्दरजनी साहित्य  समूह आयोजित 
सराव उपक्रम  सुनीत काव्य लेखन
विषय -- ओंजळ फुलांची

    *प्रेम भाव*
ओंजळ फुलांची भरली 
वाहू कुणाच्या चरणी?
सदा लीन रहावे शरणी
मायबापांची  माया कधी का सरली.?

प्रेमाने  वहीन फुलांची ओंजळ
 पण कैसे फेडू तुमचे ऋण?
निवांतता नव्हता तया एक क्षण.
कसे फेडणार ऋण  सांगा   प्रांजळ?

जन्मभर कष्ट करुनी विणले सुखाचे धागे
वेळ आता आपुली, का पळावे दूर?
फेड उपकारांची करावी ,न पहाता मागे.
नको रहाण्या मनी सदैव हूर हूर

झिजवली काया  देण्यासाठी  सुख
मग आता नका देवू तयाना दुःख 

वैशाली वर्तकशब्दशिल्प कलाविष्कार संध
आयोजित उपक्रम
काव्यप्रकार...सुनीत
विषय... बेरोजगारी 
     *कशाला चाकरी*
 
रंगवली होती साहेबी स्वप्ने मनात
मनाजोगती नक्की मिळेल नोकरी 
झालो आहोत ना उत्तम पदवीधर ?
आता कसलाच नाही खेद अंतरी .  1      

केले अर्ज अनेक जागी कचेरीत
काय झाले असूनही कुशाग्र बुध्दी हुशार,?
वशीलेवाले सारे पुढे निघाले
सर्वत्र दिसला माजलेला भ्रष्टाचार..2

काय करावे काही कळेना
शिकून सावरुन पण मी का बेकार?
क्षणात वाटे हातातली प्रमाणपत्रे
हासत म्हणती तू शिक्षीत *बेरोजगार*

 न होता विचलित,धावत आलो शिवारी
माझीमाय काळी माती,कशाला करु  चाकरी

वैशाली वर्तक
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...