शनिवार, ६ फेब्रुवारी, २०२१

उद्याचा विचार दूरदृष्टी 6/2/2021

अ.भा म  सा प समूह02
विषय - दूरदृष्टी
*उद्या चा विचार*

जीवनाच्या  वाटेवर 
हवी सदा दूर दृष्टी  
वाट होते ती सुलभ
नाही होत मन कष्टी

दूरदृष्टी   ठेवताच
मार्ग  कामाचा सुलभ
 मिळे   पावती कामाची
नुरे चिंतेचे मळभ

साधी मुंगी पहा कशी
करी  अन्नाची साठवण
ठेवूनिया दुरदृष्टी करी
पावसाची  बोळवण

 
करा सारासार विचार 
यश दिसे उभे दारी
यालाच म्हणे दूर दृष्टी 
आहे ना गंमत भारी

आपल्याला सुखासाठी
माय बापांची दुरदृष्टी
येतेय आता ती कामी
कशी सुंदर  भासे  सृष्टी 

वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...