स्पर्धेसाठी
अष्टाक्षरी
विषय -- साऊ
*सावित्री माऊली*
सावित्रीच्या लेकी सा-या
तूच भरूनी प्रकाश
केल्या कर्तृत्वान नारी
तेजाळती त्याआकाश
दिली उघडून द्वारे
मार्ग दावि प्रगतीचा
तूच आद्य स्त्री शिक्षिका
मान तुला सन्मानाचा
ज्योत क्रांतीची तुझ्यात
ठेवलीस तेजाळत
त्रास साहूनी प्रजेचा
केले स्रियांना प्रगत
शेण गोळे दगडांचे
साहूनिया भारी घाव
दिली लेखणीस हाती
केले उज्वल स्त्री नाव
सावित्रीच्या आम्ही लेकी
तुला सदैव वंदन
तुझ्यामुळे झाले आज
तूची दिले संजीवन
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा