शुक्रवार, ५ फेब्रुवारी, २०२१

माणसे कशी जोडावी /हातची माणसे



सावली प्रकाशन समूह आयोजित  
काव्य लेखन 
नाते
विषय -- माणसे कशी जोडावी



माणसे जोडणे आहे कला
आधी माणुसकीला जागा
 मानवता हाची धर्म जाणा
बांधला जाईल प्रेमाचा धागा


नको मिथ्याभिमान मनी
वाणीत हवी साखर थोडी
सहकाराची भावना मनी
कोण करेल उगा कुरघोडी

जेथे तेथे  नको  मी पणा
त्रासदायक वाटे इतर जीवा   
वाद विवाद शक्यतो टाळा
माघार घेण्याची नीती ठेवा

द्यावा सदा मान इतरास 
नको मनी शंकेचे मळभ
निखालस भाव ठेवता
माणसे जोडणे होते सुलभ  

 तुकड्या-तुकड्यात नकाशा विश्वाचा       जगाच्या नकाशाचे तुकडे
पाठी  मागे होते माणसाचे चित्र               मागे  होते चित्र माणसाचे
  मानवाचे  चित्र जोडले जाता                  चित्र माणसाचे  जोडता
सहज झाला विश्वाचा मित्र                         सहज जुळले नाते विश्वाचे


वैशाली वर्तक 








लालित्य नक्षत्रवेल
आयोजित उपक्रम

विषय.. हाती आलेली माणसं 

संपर्कात आलेली माणसे
करा सदा आपलीशी
नको मनी कोतेपणा 
वाटतील हवी हवीशी 

माणसे जोडणे आहे कला
आधी माणुसकीला जागा
मानवता हाची धर्म जाणा
बांधला जाईल प्रेमाचा धागा

नको मिथ्याभिमान मनी
वाणीत हवी साखर थोडी
सहकाराची भावना मनी
कोण करेल उगा कुरघोडी

जेथे तेथे  नको  मी पणा
त्रासदायक वाटे इतर जीवा   
वाद विवाद शक्यतो टाळा
माघार घेण्याची नीती ठेवा

द्यावा सदा मान इतरास 
नको मनी शंकेचे मळभ
निखालस भाव ठेवता
माणसे जोडणे होते सुलभ

  तीच असे खरी श्रीमंती
 असे प्रिय सर्व माणसात
 हाताची माणसे जपत
वावरतो सर्व जगतात

वैशाली वर्तक
अहमदाबाद



वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...