उपक्रम
उबदार बंब
होता परसदारी
ऐटीत बंब उभा
गरम पाण्याची
होती सदा मुभा
सकाळीच आई
बंब पेटवायची
तोंड धुण्या पासून
ऊन पाणी द्यायची
थंडीची अभ्यंगस्नाने
व्हायची ओळीने
कडकडीत पाणी
मिळे सोयी सोयीने
गेले ते दिन आता
सौरऊर्जा आली
गिझर मागे पडले
वीजेची बचत झाली
राहिल्या आठवणी
बंबच्या मनात
पहा तयाला खेळातल्या
चिमुकल्या घर संसारात
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा